+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule26 May 24 person by visibility 302 categoryक्रीडा
नवी दिल्ली : IPL 2024 चा अंतिम सामना आज चेन्नईच्या एमए चिदंबरम  स्टेडियमवर हैदराबाद आणि कोलकाता यांच्यात होणार आहे.   आयपीएलच्या 17व्या हंगामातील हा 74वा आणि शेवटचा सामना असेल. कोलकाताने दोनदा विजेतेपद पटकावले आहे, तर हैदराबादने एकदा विजेतेपद पटकावले आहे. पुन्हा एकदा दोन्ही संघ चॅम्पियन बनण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.  

कोलकाता दोनदा (2012, 2014) चॅम्पियन बनला आहे आणि दोन्ही वेळा संघाचा कर्णधार गौतम गंभीर होता. 2012 मध्ये, संघाने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून पहिली फायनल जिंकली होती, तर 2014 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबला हरवून चॅम्पियन बनले होते. या हंगामात गंभीर एका मार्गदर्शकाच्या भूमिकेत असून विजेतेपद जिंकून त्याला त्याच्या आठवणी ताज्या करायच्या आहेत. या हंगामात संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर आहे.

कोलकाताने क्वालिफायर 1 मध्ये हैदराबादचा पराभव करून अंतिम फेरी गाठली, तर हैदराबादने क्वालिफायर 2 मध्ये राजस्थानचा पराभव करून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. या मोसमात दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले असून दोन्ही वेळा कोलकाताने विजय मिळवला आहे. या मोसमात कोलकाताने सुरुवातीपासूनच फॉर्ममध्ये दिसला आणि 14 पैकी 9 सामने जिंकले. तर हैदराबादने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये विरोधी संघावर एकतर्फी वर्चस्व गाजवले पण नंतरच्या सामन्यांमध्ये संघर्ष करताना दिसले तर आयपीएलच्या इतिहासात दोन्ही संघ 27 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये कोलकाता 18 वेळा जिंकला आहे.  

 फायनलमध्ये पाऊस पडला तर काय होईल, हे क्रिकेटप्रेमींना जाणून घ्यायचे असेल. आज संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून सामना सुरु होणार आहे.  जर पाऊस पडला आणि सतत पाऊस पडत असेल तर सामना दुसऱ्या दिवशी राखीव दिवशी जाऊ शकतो. दुसऱ्या दिवशीही पाऊस पडला तर किमान ५-५ षटकांचा खेळ होऊ शकतो. सुपर ओव्हरद्वारेही सामन्याचा निकाल लावला जाऊ शकतो. आणि जर हे देखील करता आले नाही आणि पाऊस पडत राहिला तर कोलकाता गुणांच्या आधारे चॅम्पियन घोषित होईल.