+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात: ७ उमेदवार जाहीर; करवीरमधून अँड. माणिक शिंदे adjustकोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त adjustविधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही adjust‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना : नवीन ४००० बायोगॅस मंजुर; या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : चेअरमन अरुण डोंगळे adjustभागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान adjustमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा... adjustकोल्हापूर महानगरपालिका : वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणाऱ्या 17 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात adjustकोल्हापुरात शेतकऱ्यांचा निर्धार : महायुतीचे ७२ उमेदवार पाडणार adjust२७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त adjustकोल्हापुरात २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकाऱ्यास अटक
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule14 Oct 24 person by visibility 260 categoryगुन्हे
 मिरज : मिरज येथील कृष्णाघाटावर दुर्गा माता देवी मूर्तीचे विसर्जन करते वेळी तिघेजण पाण्याच्या प्रवाहात बुडाले. मात्र दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. बुडालेला एकजण अजूनही बेपत्ता आहे. अमित गायकवाड (वय १८ रा. सुभाषनगर) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे.रविवारी संध्याकाळपर्यंत त्याचा शोध घेण्यात आला.पण तो सापडला नाही.

 सुभाषनगर येथील अंबिकानवरात्र उत्सव मंडळाच्या देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यास सर्वजण शनिवारी संध्याकाळी आले होते. मूर्ती विसर्जन करण्यासाठी अमित गायकवाड (वय १८) हा सुद्धा कार्यकर्त्यांच्या समवेत पाण्यात उतरला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचवण्यास लक्ष्मण मोरे (वय ४५), अमोल गायकवाड (वय १७) यांनी उड्धा घेतल्या. तिघेजण बुडत आहेत म्हटल्यावर आयुष हेल्प लाईन आपत्कालीन पथकाचे सदस्य योगेश आनंदे यांनी तात्काळ पाण्यात उडी घेतली.

लक्ष्मण मोरे आणि अमोल गायकवाड या दोघांना त्यांनी वाचवले. परंतु अमित गायकवाड पाण्याच्या प्रवाहात बराच लांब गेला. नदीपात्रामध्ये शोध मोहीम रात्री उशिरा पर्यंत सुरू होती. मात्र अमित आढळून आला नाही. रविवारी सकाळी पुन्हा शोध मोहीमेस सुरुवात करण्यात आली. रविवारी संध्याकाळ पर्यंत अमित आढळून आला नव्हता. शोध मोहीमेसाठी आयुष हेल्पलाइन टीम तसेच अग्रिशामक दल शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.

* रूई बंधाऱ्यातून युवक वाहून गेला 
हुपरी : दुर्गामाता मूर्तीचे विसर्जन करताना माणगाव ( ता. हातकणगंले) योथील प्रकाश शिवाजी परीट (वय ३५) हा युवक वाहून गेला.

 यामध्ये अन्य सहाजण बचावले असून ही घटना शनिवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान रूई बंधारा येथे घडली. बोटीच्या सहाय्याने दिवसभर शोधमोहीम सुरू होती. मात्र मृतदेह अद्याप सापडला नाही.

 माणगाव येथील गांधी चौक तरूण मंडळाच्या वतीने शनिवारी दुर्गामाता मूर्तीचे विसर्जन करण्याकरिता रूई येथील पंचगंगा नदीवरील बंधारा नजीक मंडळाचे वीस तीस कार्यकर्ते गेले होते. मूर्ती घेवून आठ कार्यकर्ते नदीपात्रात उतरले. यावेळी काही कार्यकर्ते नदीत कोसळले.पाण्याला प्रचंड वेग असल्याने प्रकाश परीट हा वाहून गेला.