प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
schedule30 Dec 24 person by visibility 172 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज विद्यापीठात त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
सकाळी साडेदहा वाजता विद्यापीठ अतिथीगृहाच्या प्रांगणातील डॉ. पवार यांच्या अर्धपुतळ्यास कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मुख्य प्रशासकीय भवन इमारतीसह डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवन येथेही डॉ. पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख,
वृत्तपत्रविद्या व संज्ञापनशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. निशा मुडे-पवार, डॉ. कविता वाळवेकर, डॉ. दीपक भादले, डॉ. नीलेश तरवाळ, डॉ. जी.पी. माळी, डॉ. सी.एच. भोसले, डॉ. एस.जे. नाईक, डॉ. अशोक जगताप, किसनराव कुराडे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.