कॉग्रेसचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी उद्धव ठाकरे यांची घेतली सदिच्छा भेट
schedule10 Jun 24 person by visibility 490 categoryराजकीय

कोल्हापूर : कॉग्रेसचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज मुंबई येथे माजी मुख्यमंत्री व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.
कोल्हापूर लोकसभा हा पारंपारिक ठाकरे गटाचा मतदारसंघ आहे. मात्र, शाहू महाराजांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ही शाहू महाराज यांच्यासाठी काँग्रेसला सोडली होती. कोल्हापुरात गांधी मैदानामध्ये झालेल्या शिव शाहू निर्धार सभेला उद्धव ठाकरे यांनी संबोधित करत शाहू महाराजांच्या विजयासाठी आवाहन केले होते. काँग्रेसकडून शाहू महाराज यांनी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा एक लाख 54 हजारांवर मतांनी पराभव केला. या पार्श्वभूमीवर शाहू महाराज उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचले होते.
यावेळी आमदार आदित्य ठाकरे, रश्मी उद्धव ठाकरे, विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते.