SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विद्यापीठाच्या काळसेकर पुरस्कारांचे २९ सप्टेंबरला वितरणगणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांनी वाहन व कागदपत्रांची तपासणी करुन घ्यावीप्रवाशांच्या खिशावर दरोडा? एसटी-खासगी बसचालक मनमानी भाडे आकारल्यास आता थेट कारवाई; आरटीओचा कडक इशारा!वारणा विद्यापीठात २९ सप्टेंबरला ‘मेगा जॉब फेअर आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन: संवादाच्या नव्या युगाचा पायागोकुळ दूध संघ निवडणूक: २५ जागांसाठी तब्बल ३०१ उमेदवारांचे अर्ज दाखल; आजी-माजी दिग्गजांचे उमेदवारी अर्ज दाखल!कोल्हापूर महानगरपालिका : 39 स्वच्छता कर्मचाऱ्यांवर 500 रुपयांची तर 1 मुकादमवर 2000 रुपयांची दंडात्मक कारवाईसार्वजनिक गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा सज्जकोल्हापूर महानगरपालिका : वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहाय्यक आयुक्तांनी नियमित आढावा घेऊन प्रभावी काम करावे : आयुक्त डॉ.राजेंद्र भारुडजनसेवेचा आदर्श! रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कृष्णराज महाडिक यांचा स्तुत्य उपक्रम

जाहिरात

 

विद्यापीठाच्या काळसेकर पुरस्कारांचे २९ सप्टेंबरला वितरण

schedule23 Sep 26 person by visibility 160 categoryराज्य

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या सन २०२६ च्या काळसेकर पुरस्कारांचा वितरण समारंभ येत्या २९ सप्टेंबर रोजी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते होणार आहे. ही माहिती मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी दिली आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारे २०२६ सालचे सतीश काळसेकर काव्य पुरस्कार आणि ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार हे अनुक्रमे ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर आणि कवी रवी कोरडे यांना यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहेत. ज्‍येष्ठ साहित्यिक, कवी, समीक्षक प्रा. वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते येत्या मंगळवारी (दि. २९) विद्यापीठाच्या गणित अधिविभागातील रामानुजन सभागृहात सकाळी १०.३० वाजता पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला आहे. 

समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत असतील. आदित्य काळसेकर यांच्यासह काळसेकर कुटुंबीयही समारंभास उपस्थित राहणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes