मुंबईमध्ये अवकाळी पावसाचे थैमान; होर्डिंग कोसळून मोठे नुकसान; रेल्वे, रस्ते वाहतुक ठप्प
schedule13 May 24 person by visibility 717 categoryदेश

मुंबई : मुंबईमध्ये वाऱ्यासह अवकाळी पावसाने तुफान हजेरी लावली असून यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर येत आहे . घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून सात हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तसेच वडाळा येथे पार्किंग लिफ्ट कोसळली असून काही वाहने त्याखाली सापडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ठीक ठिकाणी पाणी साचून वाहतुकीचा बोजवारा उडाला असून काही ठिकाणी झाडे कोसळून दुर्घटना दुर्घटना घडल्याचे समोर येत आहे . मुंबई ठाण्याकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली असून मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या रांगा पहावयास मिळत आहेत.
घाटकोपर मध्ये मोठे होर्डिंग पेट्रोल पंपाच्या छतावरती कोसळले यामुळे पेट्रोल पंपा खाली उभारलेल्या सुमारे 100 ते 150 लोक अडकण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे तसेच या घटनेत सात लोक जखमी झाल्याचे आता समोर येत आहे .व बचावकार्य सुरू आहे तसेच वडाळा येथे पार्किंग लिफ्ट कोसळल्यास यामध्ये काही वाहण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या समोर येत आहे ठीक ठिकाणी झाडेही पडल्याची घटना समोर येत आहे तसेच
मुंबईतील पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून मुंबईकरांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच हवामान विभागाने पुढील दोन ते तीन तास वाऱ्यासह पाऊस सुरू राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली असून असून नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.