+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule07 Jul 24 person by visibility 676 categoryगुन्हे
कोल्हापूर जिल्ह्यातील कोपार्डे येथील स्वप्नील कृष्णा पाटील आणि सुहास कृष्णा पाटील या सख्या भावांचा 3 जुलै रोजी शिवारात काम करत असताना विद्युत तारेचा स्पर्श होऊन या दोघांचा मृत्यू झाला होता. आपल्या दोन्ही तरुण मुलांचा मृत्यूच्या घटनेचा धक्का त्यांची आई नंदाताई कृष्णा पाटील यांना बसला. आज त्यांनी आपल्या लेकरांसाठी अखेरचा श्वास घेतला. ही दुदैवी घटना कोपार्डे ता. शाहूवाडी येथे घडली. नंदाताई कृष्णा पाटील (रा कोपार्डे, वय ६०) असे मृत महिलेचे नाव आहे. 
 
याबाबत अधिक माहिती अशी, कोपार्डे ता. शाहूवाडी येथील कडवी नदीजवळ असणा-या शेतात सुहास कृष्णा पाटील (वय ३६) व स्वप्नील कृष्णा पाटील (वय ३१) हे दोघे भाऊ भात रोप लावण आटोपून बुधवारी दुपारी पिकांवर तणनाशक मारण्यासाठी शेताकडे गेले होते. तणनाशक मारत असताना सुहासला वीजेच्या तारेचा जोरदार धक्का बसून तो शेतात पडला असता, दादा काय झाल असे म्हणत स्वप्नील त्यांच्याजवळ गेला असता त्यालाही वीजेचा धक्का बसून दोघे भाऊ शेतात निपचित पडले. यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आज रविवारी दि ७ रोजी सुहास आणि स्वप्नील यांच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम होता. 

आपल्या दोन्ही मुलांचा आकस्मित मृत्यू  नंदा पाटील यांना सहन झाला नाही. आज रविवार (दि ६) रोजी दोन्ही मुलांचे रक्षाविसर्जन होते. तत्पूर्वी शनिवारी रात्री अकरा वाजता आई नंदा यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची मध्यरात्री प्राणज्योत मावळली.