+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule23 Jul 24 person by visibility 295 categoryगुन्हे
कोल्हापूर : कबनूर (ता. हातकणंगले) येथील पाणीपुरवठा पाइपलाइनचा कार्यारंभ आदेश काढण्यासाठी ९ हजार रुपयांची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी गणपत धनाजी आदलिंग (वय ५७, रा. मराठा कॉलनी, कसबा बावडा, कोल्हापूर) हा लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात सापडला. ही कारवाई सोमवारी (दि. २२) दुपारी चारच्या सुमारास जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागात झाली. आदलिंग याच्या विरोधात ठेकेदाराने तक्रार केली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक बापू साळुंके यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ठेकेदारआहेत. निविदेनुसार त्यांना कबनूर येथील वाढीव पाइपलाइनचे काम मिळाले होते. २ लाख ४० हजार रुपयांच्या कामांचा आदेश काढावा, यासाठी ते ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग याला भेटले. त्यावेळी आदलिंग याने आदेश काढण्यासाठी ९ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेतलाचेची रक्कम घेऊन बोलावले. दरम्यान, याबाबत ठेकेदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. निरीक्षक साळुंके यांनी तक्रारीची पडताळणी करून सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेत सापळा रचला या सापळ्यात आदलिंग हा ९ हजार रुपयांची लाच घेताना सापडला. पोलिसांनी त्याला अटक करून शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक बापू साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली यामध्ये मध्ये पो.हे.कॉ. विकास माने, पो.हे.कॉ. सुनील घोसाळकर, पो. ना. सचिन पाटील, पो.कॉ. संदीप पवार, ला.प्र.वि.कोल्हापूर यांचा सहभाग होता.