SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
क्रांतीची पहिली ठिणगी: हुतात्मा दामोदर हरी चाफेकरसंजय घोडावत इन्स्टिट्यूट, उन्हाळी परीक्षा २०२६ मध्ये सर्व विभागांचा उच्चांकित निकाल; २९ विषयाचा निकाल १०० टक्केविश्वप्रभा नागरी पतसंस्थेतील ८ कोटींच्या अपहाराची चौकशी करा; ठेवीदारांचा आक्रमक पवित्राकोल्हापूर : उपसा बंदीला २६ जूनपर्यंत पुन्हा शिथिलताक्रांती चौकाने घेतला मोकळा श्वास ; शहरातील युवकांच्याकडून नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचे अभिनंदन डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरतर्फे उद्यापासून दोन दिवसीय ‘आर्किटेक्चर बूट कॅम्प’दहावी नंतरच्या पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्जाची मुदत वाढली; आता २ जुलैपर्यंत अर्ज करता येणारअवसायकांच्या निर्णयाला उच्च न्यायालयाचा दणका; फणसवाडीच्या हनुमान सहकारी दूध संस्थेच्या याचिकेवर निर्णयकरवीर नगरीत खाशाबा जाधव पुरस्काराने ऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील गौरवितयुवा पिढीला नशामुक्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध; प्रत्येक जिल्ह्यात होणार व्यसनमुक्ती केंद्र: मुख्यमंत्री फडणवीस

जाहिरात

 

महिला आरक्षण विधेयक म्हणजे भाजपचे षडयंत्र; आमदार सतेज पाटील, विश्वजित कदम यांचा घणाघाती आरोप

schedule27 Apr 26 person by visibility 481 categoryराजकीय

कोल्हापूर: केंद्र सरकारने आणलेले महिला आरक्षण विधेयक म्हणजे विरोधकांशी कोणतीही चर्चा न करता केलेला विश्वासघात असून, हे भाजपचे एक मोठे राजकीय षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप आमदार सतेज पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांनी केला आहे. या विधेयकातील त्रुटी आणि त्यामागील केंद्राची भूमिका यावर त्यांनी सडकून टीका केली.

आमदार विश्वजित कदम यांनी विधेयकातील 'सीमांकन' या अटीवर तीव्र आक्षेप नोंदवला. त्यांच्या मते: ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणाचे प्रभावी उपाय योजले आहेत, अशा राज्यांवर या प्रक्रियेमुळे अन्याय होणार आहे. लोकसंख्येच्या आधारावर खासदारांची संख्या वाढल्यास, त्याचा फायदा विशिष्ट राज्यांनाच होईल आणि दक्षिण भारतासह इतर प्रगत राज्यांचे लोकसभेतील प्रतिनिधित्व कमी होईल.


 तसेच उत्तर भारतातील काही राज्यांचे प्रतिनिधित्व ३८% वरून ४१% वर जाण्याची शक्यता आहे, तर दक्षिण भारताचे प्रतिनिधित्व २४% वरून २०% पर्यंत खाली येऊ शकते.

आमदार सतेज पाटील म्हणाले की, "हे विधेयक २०२४ च्या निवडणुकीत लागू का केले नाही? १८० जागा आधीच राखून ठेवून नंतर सीमांकन करता आले असते. केवळ विशिष्ट राज्यांमध्ये लोकसंख्येच्या जोरावर आपली आकडेवारी वाढवून देशाला कायमस्वरूपी हुकूमशाहीच्या मार्गावर नेण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे."

आमदार पाटील पुढे म्हणाले या विधेयकात आरक्षण नक्की कोणाला मिळणार, कोणत्या मतदारसंघांत मिळणार आणि त्याचे निकष काय असतील, यावर सरकारने कोणतीही स्पष्टता दिलेली नाही. "मुख्यमंत्र्यांनी चर्चेचे आवाहन दिले असले तरी, ते केवळ घोषणाबाजी करून पळ काढत आहेत," अशी टीकाही यावेळी करण्यात आली.


विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मागणी केली आहे की, सरकारने हे विधेयक रेटून नेण्यापूर्वी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून सीमांकन आणि आरक्षणाचे निकष स्पष्ट करावेत. जोपर्यंत हे स्पष्ट होत नाही, तोपर्यंत काँग्रेस पक्ष या 'राजकीय षडयंत्राला' विरोध करत राहील, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes