बिहार विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू, , मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण
schedule06 Nov 25 person by visibility 57 categoryदेश
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी गुरुवारी 6 नोव्हेंबर 2025 सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यात राज्यातील 18 जिल्ह्यांमधील 121 विधानसभा जागांवर मतदान होत आहे. यात एकूण 3.75 कोटी मतदार 1,314 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद करतील. दरम्यान आज गुरुवारी पहिल्या टप्प्यातील मतदान होत असून मतदान केंद्राबाहेर मतदानाच्या रांगा लागल्या असून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे
या टप्प्यात महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्यासहसम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांच्यासह अनेक मंत्री, भोजपुरी चित्रपटातील सुपरस्टार खेसारी लाल यादव आणि लोकगायक मैथिली ठाकूर यांचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात ज्या आघाडीला जास्त जागा मिळतील, ती आघाडी बिहारमध्ये सरकार स्थापन करण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील निवडणूक अत्यंत महत्त्वाची असणार आहे.