+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule09 Jun 24 person by visibility 473 categoryदेश
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांनंतर एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा आज सायंकाळी पार पडणार असून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. आजच्या शपथविधी सोहळ्यात एनडीएमधील घटकपक्षांचे नेते कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतील. 

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाला प्रत्येकी एक मंत्रीपद देण्यात येणार आहे. राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल तसेच शिवसेना शिंदे गटाकडून खासदार प्रतापराव जाधव यांना मंत्रीपदासाठी फोन आला आहे. तसेच भाजपच्या खासदार रक्षा खडसे, पियुष गोयल, नितीन गडकरी, यांनाही मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे.

एनडीए सरकारमध्ये किंगमेकर ठरलेल्या चंद्राबाबू नायडू यांच्या TDP पक्षाचे राममोहन नायडू कॅबिनेट मंत्री तर पेम्मासानी चंद्रशेखर हे राज्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी हे सुद्धा नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात शपथ घेतील.

RLD प्रमुख जयंत चौधरी आणि अपना दलाच्या प्रमुख अनुप्रिया पटेल यांनाही दिल्लीतून फोन आला आहे. त्याच बरोबर अर्जुनराम मेघवाल, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमार स्वामी, प्रल्हाद जोशी, भाजपचे खासदार सर्वानंद सोनेवाल, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. तसेच मध्यप्रदेशचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनाही पुन्हा मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे.