ज्याचा वर्तमानकाळ आखीव असतो,त्याचा भविष्यकाळ प्रयत्नांच्या जोरावर रेखीव व प्रभावी होतो : माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत
schedule05 Dec 25 person by visibility 60 categoryशैक्षणिक
▪️शिष्यवृत्ती प्रदान समारंभ कार्यक्रमांत शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्याकडून ११,१११ रुपये देणगी जाहीर
कोल्हापूर : स्पर्धा ही केवळ जिंकण्यासाठी नसून स्वतः ला घडविण्याची आणि क्षमता ओळखण्याची संधी आहे. परिश्रम, शिस्त,वेळेचे व्यवस्थापन आणि सातत्य या गुणांमुळे यश निश्चित मिळते.आपल्या सेवेशी ,कामाशी प्रामाणिक राहून मेहनत, चिकाटीच्या जोरावर प्रयत्न केल्यास प्रत्येक विद्यार्थी शाळा, कुटुंब,समाज आणि राष्ट्राचे नाव उज्ज्वल करू शकते असे प्रतिपादन जिल्हा परिषद कोल्हापूर च्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी व्यक्त केले.
त्या जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर या प्रशालेत शिष्यवृत्ती प्रदान समारंभ कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, डॉ.स्मिता बचाटे व सुरज पाटील यांनी प्रत्येकी अकरा हजार एकशे एक (११,१११ रक्कम) जाहीर केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य डॉ गजानन खाडे यांनी अनुशासन,कष्ट, स्वप्न व सातत्य यांचे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्व अधोरेखित असून आज मिळालेले बक्षीस हे केवळ एक सन्मान नसून भविष्यातील अधिक मोठ्या यशाची सुरूवात आहे.यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा, उर्जा घेऊन आपले ध्येय साध्य करावे.
शालिनी राठोड, ज्ञानेश्वरी जाधव,उज्मा सिंधी, शर्वरी नवलव, गायत्री आंबी, श्रावणी पाटील, ओंकार पोवार,प्राची लाखे,सोहम जठार, अजिंक्य ठिकडे, सानिया देसाई,सिद्धी धुमाळ, ऐश्वर्या महाडिक, कल्याणी जाधव, समृद्धी झाडकर,मोहन वडर या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, पुष्पगुच्छ देऊन १२ शिष्यवृत्ती माध्यमिक व २२शिष्यवृत्ती उच्च माध्यमिक विभागाकडील विद्यार्थ्यांना शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी गायत्री आंबी,प्राची लाखे या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी इतर देणगीदार यांच्याबरोबर माजी प्राचार्य विजय डोणे,प्राचार्य डॉ गजानन खाडे,प्रा वनिता खडके,प्रा अनिल लाड,प्रा विकास पाटील,प्रा राहूल देशमुख,प्रा.सपन माने, गजानन क्षीरसागर, सतिश बागल या शिक्षक कर्मचारी वर्गांनी गुणवंत विद्यार्थ्यांना ठेव ठेवलेल्या देणगी वरील शिष्यवृत्ती प्रदान केली. पाहुण्यांचा परिचय व स्वागत प्रा.बी टी.यादव , प्रास्ताविक प्रा.बी.पी.माळवे माध्यमिक शिष्यवृत्ती वाचन एच.जे. पठाण, उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्या प्रा. वनिता खडके, सूत्रसंचालन प्रा. सुषमा पाटील व आभार प्रा. अयोध्या धुमाळ यांनी मानले.
यावेळी पर्यवेक्षिका एस व्ही पत्रावळे,प्रा संजय कुंभार,प्रा हर्षवर्धन काटकर,प्रा भाऊसाहेब धराडे, डॉ.संतोष माने,प्रा दिपा सुतार,प्रा .प्रमिला मळगे,विद्या कदम, दिपाली पाटील,पुनम माळी,माधवी खाडे या शिक्षक वृंदा सोबत शिक्षकेतर कर्मचारी,पालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते.