SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
संयुक्त राष्ट्र दिन: जागतिक शांतता आणि एकात्मतेचे प्रतीक पार्श्वभूमी आणि स्थापनापुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक: कोल्हापूर जिल्ह्यात चुरशीने मतदान; उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंदपरीक्षा अर्जासाठी ‘झिरो चलन’ सुविधा उपलब्ध : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटीलसिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचे राज्यपालांना निमंत्रणघरफाळा थकबाकीदारांवर कोल्हापूर महापालिकेची कारवाई; दोन गाळे सील, पाच मिळकतींचे पाणी कनेक्शन खंडितशहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने 62 थकबाकीदार कनेक्शन धारकांवर कारवाईगोकुळच्या साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त न्याय मिळू दे; सतेज पाटील यांचे गाेकुळ संचालकांना घेऊन हालसिद्धनाथाला साकडेकोल्हापुरातील सायबर महाविद्यालयात २७ व २८ ऑक्टोबर रोजी ‘किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’शालेय पोषण आहारात 'केंद्रीय किचन पद्धती'ला तीव्र विरोध; कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २६ ऑक्टोबरला निदर्शनेभुदरगड महसूल लोक अदालतीत २२ प्रकरणांमध्ये तडजोड; १७६ खातेदारांना लाभ

जाहिरात

 

कोल्हापूर शहराच्या आरोग्य सुविधांना मिळणार नवी दिशा: महानगरपालिका आरोग्य समितीच्या पहिल्याच बैठकीत महत्त्वाचे निर्णय

schedule28 Aug 26 person by visibility 554 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : शहरातील डेंग्यू, रेबीज, कचरा उठाव, स्वच्छता आणि आरोग्य केंद्रांच्या खालावलेल्या सद्यस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य समितीची पहिली सभा आज स्थायी समिती सभागृहात पार पडली. आरोग्य समिती सभापती  सुरेखा ओटवकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शहरातील सर्व दवाखान्यांच्या बळकटीकरणावर भर देण्यात आला.

​ उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून शहरातील सर्व दवाखान्यांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे निधीअंतर्गत प्राप्त निधी व नियोजित कामांची माहिती सादर केली.

​ उपसभापती वैभव माने यांनी सावित्रीबाई फुले व पंचगंगा रुग्णालयातील वॉर्ड बॉय, आया कम स्विपर आणि ड्रेसर यांसारख्या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा मुद्दा उपस्थित केला. तसेच आरोग्य केंद्रांच्या इमारतींची डागडुजी व सुलभ शौचालयांबाबत प्रश्न मांडले.
​वैद्यकीय अधिकारी भरती: सदस्या सौ. स्वाती येवलूजे यांनी शहरातील फिजिओथेरपी सेंटरमधील वैद्यकीय अधिकारीपदाची भरती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

​आरोग्य सुविधांना प्राधान्य: शहरातील सर्व आरोग्य समस्या सोडवण्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सभापती  सुरेखा ओटवकर यांनी दिले.

​या बैठकीस आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, अधीक्षक सागर कांबळे, रुग्णालयाचे मेडिकल ऑफिसर, आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes