SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
घालवाड येथील आरोग्य शिबिरात ३८६ नागरिकांची तपासणीसंयुक्त राष्ट्र दिन: जागतिक शांतता आणि एकात्मतेचे प्रतीक पार्श्वभूमी आणि स्थापनापुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक: कोल्हापूर जिल्ह्यात चुरशीने मतदान; उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंदपरीक्षा अर्जासाठी ‘झिरो चलन’ सुविधा उपलब्ध : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटीलसिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचे राज्यपालांना निमंत्रणघरफाळा थकबाकीदारांवर कोल्हापूर महापालिकेची कारवाई; दोन गाळे सील, पाच मिळकतींचे पाणी कनेक्शन खंडितशहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने 62 थकबाकीदार कनेक्शन धारकांवर कारवाईगोकुळच्या साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त न्याय मिळू दे; सतेज पाटील यांचे गाेकुळ संचालकांना घेऊन हालसिद्धनाथाला साकडेकोल्हापुरातील सायबर महाविद्यालयात २७ व २८ ऑक्टोबर रोजी ‘किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’शालेय पोषण आहारात 'केंद्रीय किचन पद्धती'ला तीव्र विरोध; कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २६ ऑक्टोबरला निदर्शने

जाहिरात

 

देवीदास मिसाळ, कृष्णा ठाकरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच येथे अवमान याचिका दाखल

schedule14 Aug 26 person by visibility 513 category

* दूध संस्थांना मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी दबावाखाली काम केल्याचा आरोप
        
कोल्हापूर : विभागीय उपनिबंधक (सहकारी संस्था, दुग्ध)  देवीदास मिसाळ आणि सहनिबंधक (दुग्ध, कोल्हापूर)  कृष्णा ठाकरे यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयाच्या अवमानप्रकरणी अवमान याचिका दाखल झाली. करंजफेण ता. राधानगरी  येथील श्री. विठ्ठलाई महिला सहकारी दूध व्यवसायिक संस्थेने उच्च न्यायालय सर्किट बेंच, कोल्हापूर येथे ही अवमान याचिका दाखल केली आहे. संस्थेच्यावतीने ॲड. भूषण मंडलिक यांनी ही अवमान याचिका दाखल केली आहे. संस्थेच्या अध्यक्षा  पल्लवी अनुप वाघरे यांनी ही माहिती दिली.
             
याबाबत अधिक माहिती अशी, उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच, कोल्हापूर यांनी दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी पारित केलेल्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावणे, न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणे तसेच या संस्थांचा अवसायन आदेश रद्द केलेला असतानाही कच्च्या मतदार यादीमध्ये संस्थेचा समावेश न केल्यामुळे ही अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.
        
दि. २३ जून २०२६ रोजी न्यायालयाने सदर अवसायन आदेशास स्थगिती दिली होती. ही स्थगिती अंतिम निकाल होईपर्यंत म्हणजेच दि. १२ ऑगस्ट २०२६ पर्यंत कायम होती. स्थगिती कायम असतानाही त्याचा चुकीचा अर्थ लावून, आपल्या सोयीप्रमाणे जाणीवपूर्वक या संस्थांना मतदानाच्या प्रक्रियेतून बाहेर ठेवण्यासाठी व मतदानाचा अधिकार हिरावून घेण्यासाठी राजकीय हेतूने आणि दबावाखाली अवसायनाची कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संस्थेला पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागले आहेत.
       
◼️मतदार यादीतून बेकायदेशीरपणे वगळल्याचा आरोप.....!
उच्च न्यायालयाने दि. २३ जून व १ जुलै २०२६ रोजी अंतरीम स्थगीती दिली असताना आणि दि.  १२ ऑगस्ट २०२६ रोजी अवसायनाचा आदेश पूर्णपणे रद्द केला असतानाही, निवडणूक प्राधिकाऱ्यांनी दि. १२ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या 'गोकुळ'च्या प्रारूप मतदार यादीतून याचिकाकर्त्या संस्थेसह इतर संस्थांची नावे जाणीवपूर्वक वगळली.
             
▪️मतदानापासून वंचित ठेवण्यासाठीच.........!
गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यापासून दूर ठेवण्याच्या वाईट हेतूनेच न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून ही प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes