SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
'स्ट्रोक' रुग्णांसाठी " रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन” प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्याच्या आरोग्यमंत्र्याच्या सुचनारोटरी क्लब कोल्हापूर हेरिटेज आणि आरसीकेओपी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू महिलांना पिंक रिक्षा वाटपअर्थशास्त्र अधिविभागात माजी विद्यार्थी मेळावाकामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी ‘POSH’ कायद्याची कडक अंमलबजावणी; राज्यभर तपासणी मोहीमगांधीनगर येथे तंबाखूविरोधी धडक मोहीम ; २७ जणांवर कारवाई डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदकेंद्र सरकारच्या ऊस नियंत्रण धोरणाविरोधात जय शिवराय किसान संघटनेची कोल्हापुरात पत्रकार परिषद; नवीन कायद्यावर कडाडून टीकाधक्कादायक! 'तो' कुटुंबासह कोकण दर्शनाला गेला अन मागे मित्रानेच लुटले घर; कोल्हापुरात १५ लाखांच्या दागिन्यांसह एक गजाआडडीकेटीईच्या विद्यार्थ्यांची हरियाणा येथील बूटकॅम्पमध्ये चमकदार कामगिरीराष्ट्रीय डेंग्यू दिवस: जनजागृती आणि सतर्कतेची गरज

जाहिरात

 

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उद्ध्वस्त; शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, सिलिंडरचा साठा जप्त!

schedule14 Mar 26 person by visibility 243 categoryराज्य

मुंबई: मुंबईतील वरळी परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरची अवैध साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्या टोळीवर शिधावाटप विभागाने जोरदार प्रहार केला आहे. एका गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या छाप्यात सिलिंडरचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
धोकादायक साठेबाजीचा पर्दाफाश
वरळी नाका येथील गणपतराव कदम मार्गावर असलेल्या ‘सूरज वल्लभदास चाळ’ परिसरात रहिवासी वस्तीत अत्यंत धोकादायक पद्धतीने सिलिंडर साठवले जात होते. चढ्या दराने विक्री आणि बेकायदेशीर रिफिलिंगचा गोरखधंदा येथे सुरू असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप कार्यालयाला मिळाली होती. फिरते पथक आणि कार्यालय क्रमांक २१ च्या अधिकाऱ्यांनी संयुक्त मोहीम राबवून या टोळीचा पर्दाफाश केला.

या कारवाईत एचपी गॅस आणि सुपर गॅस कंपनीचे विविध वजनाचे सुमारे ७० हून अधिक भरलेले सिलिंडर आणि मोठ्या प्रमाणात रिकामे सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये ५ किलो, १२ किलो आणि ४ किलोच्या सिलिंडरचा समावेश आहे. हा सर्व साठा जप्त करून पुढील फौजदारी कारवाईसाठी वरळी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आला आहे.

"रहिवासी भागात अशा प्रकारे ज्वलनशील पदार्थांची साठवणूक करणे म्हणजे नागरिकांच्या जीविताशी खेळणे आहे," असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

 गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात यापुढेही अशीच कठोर मोहीम राबवली जाईल, असा इशारा शिधावाटप विभागाने दिला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes