SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पुणे, पिंपरी-चिंचवड विषारी दारू प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारचतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधून 70 कर्मचाऱ्यांची मुकादमपदी पदोन्नती; सेवानिवृत्त झालेल्या 29 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कारबांबवडे येथे 5 जून रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजनकोल्हापुरी चपलेचा डंका सातासमुद्रापार! ‘द कोल्हापुरी’ पुस्तकाला तब्बल ११ जागतिक पुरस्कार; 'ब्लॅक एलिफंट'वरही कोरले नाव!२५० कोटी रुपयांच्या अत्याधुनिक सुविधांचे लोकार्पण ; कोल्हापूरमधील रुग्णसेवेला नवे बळकसबा बावडा परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाईजगाच्या कल्याणासाठी मनुष्याने शाश्वत जीवनशैली पुढे घेवून जाणे आवश्यक : सिध्दार्थ शिंदेडी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; ‘इंडिया एलिट एज्युकेशन अवॉर्ड’ ने सन्मानितप्रिन्सेस पद्माराजेच्या पूर्वा केंगलेची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवडजागतिक पचन आरोग्य दिन: निरोगी शरीराची सुरुवात होते मजबूत पचनसंस्थेपासून!

जाहिरात

 

पुणे, पिंपरी-चिंचवड विषारी दारू प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

schedule29 May 26 person by visibility 102 categoryराज्य

 मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने 12 नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून, या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

 या घटनेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पुणे व पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला. या दुर्घटनेच्या मुळाशी जाऊन तपास करा आणि अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

आतापर्यंत या प्रकरणात 8 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाकडून संयुक्तपणे तपास सुरू असून, या विषारी दारूचा पुरवठा कोठून झाला आणि यात कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे, अशी माहितीही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes