SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा एच.एस.सी. परीक्षा विज्ञानशाखेचा निकाल ९४ टक्के टाइम्स एशिया रँकिंगमध्ये शिवाजी विद्यापीठाची भरारी; प्रथम सहभागातच राज्य विद्यापीठांत देशात दहावे स्थानमलकापुरात रक्ताचं नातं रक्ताळलं; क्षुल्लक वादातून सख्ख्या भावाचा काटा काढला; आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून काही तासांत बेड्याकृषी सहायकांनी प्रत्यक्ष फिल्डवर जावे : पालकमंत्री प्रकाश आबिटकरकोल्हापूर: एसटी प्रवाशांचे दागिने लांबवणारी सराईत महिला जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाईकोल्हापूर : चारित्र्याच्या संशयावरून की जुना वाद? मलकापुरात मोठ्या भावाकडून सख्या भावाचा भीषण खूनमहापालिकेच्यावतीने भगवान गौतम बुध्द जयंती साजरीशिवाजी विद्यापीठात महाराष्ट्र दिन उत्साहातघुणकीत गौतम बुद्धांची २५८८ वी जयंती साजरीजागतिक चित्रपटसृष्टीचा भारतीय मानदंड: सत्यजित राय

जाहिरात

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाहीत

schedule06 Feb 26 person by visibility 474 categoryराज्य

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे यंदा ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. पुष्पगुच्छ, भेटी आणू नयेत, शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावू नये, तसेच वाढदिवसानिमित्ताने कोणताही सोहळा आयोजित करू नये, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

अजित दादांच्या अकाली जाण्याच्या वेदनेतून महाराष्ट्र आजही सावरलेला नाही. व्यक्तिश: मी माझा सहकारी आणि मित्र गमावला आहे. दादांच्या निधनाने झालेली अपरिमित हानी भरून येणारी नाही. पवार कुटुंबाच्या दु:खात आपण सहभागी आहोत.

अशा या दुःखद परिस्थितीत वाढदिवस साजरा करणे, सोहळे-समारंभ करणे मला उचित वाटत नाही. त्यामुळेच परिस्थितीचे गांभीर्य आपण जपूया, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. माझ्या वाढदिवसानिमित्ताने कुणीही पुष्पगुच्छ आणू नयेत, होर्डिंग्स लावू नयेत, तसेच कोणताही समारंभ, कार्यक्रम आयोजित करू नयेत, अशी विनंती उपमुख्यमंत्री  शिंदे यांनी केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes