+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule11 Sep 23 person by visibility 334 categoryविदेश
नवी दिल्ली : मोरोक्कोमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.8 इतकी मोजण्यात आली आहे. मोरोक्कोच्या अंतर्गत मंत्र्यांनी सांगितले की, भूकंपातील मृतांची संख्या 2012 पर्यंत वाढली आहे. येथे 2059 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. येथे मदत कार्य जोरात सुरू असून जगातील अन्य देशही मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. पीएम मोदींनीही ट्विट करून या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आणि मोरोक्कोला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

 सुरुवातीला मोरोक्कोमधील भूकंपातील मृतांची संख्या ६३२ असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र नंतर हा आकडा वाढला आहे. मृतांपैकी अर्ध्याहून अधिक अल-हॉज आणि तारुदंत प्रांतातील होते. याशिवाय, मोरोक्कोच्या ओआरझाझेट, चिचौआ, अजिलाल आणि युसेफिया प्रांत तसेच माराकेश, अगादीर आणि कॅसाब्लांका भागातही मृत्यूची नोंद झाली आहे. या ठिकाणी जखमींची संख्या ३२९ इतकी आहे, तर ५१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

 स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, भूकंपातील मृतांची संख्या लक्षणीय वाढू शकते. भूकंपांवर लक्ष ठेवणाऱ्या मोरोक्कन संस्थेने भूकंपाची तीव्रता सातच्या पुढे असल्याचे सांगितले आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू माराकेश या पर्यटन शहरापासून 71 किमी दक्षिण-पश्चिमेस 18.5 किमी खोलीवर होता. स्थानिक वेळेनुसार रात्री 11.11 च्या सुमारास येथे भूकंपाचे धक्के जाणवले. काही वेळाने या ठिकाणी भूकंपाचे आफ्टरशॉकही जाणवले, ज्याची तीव्रता ४.९ एवढी होती.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरोक्कोमध्ये झालेल्या भीषण भूकंपात झालेल्या लोकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि या कठीण काळात भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले. G20 परिषदेच्या उद्घाटनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी या भूकंपामुळे प्रभावित झालेल्या लोकांप्रती शोक व्यक्त केला. ते म्हणाले, “संपूर्ण जागतिक समुदाय या कठीण काळात मोरोक्कोच्या पाठीशी आहे आणि आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत.”

मोरोक्कोने तीन दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला. राजा मोहम्मद सहावा यांनी आपत्तीवर चर्चा करण्यासाठी एका बैठकीच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शोक व्यक्त केला.