SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कचऱ्यात सापडलेले दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण प्रामाणिकपणे परत करणाऱ्या कोल्हापूर महापालिका सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कारई-कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन ही काळाची गरज : हिमांशू लेलेकोल्हापूर : इराणी खण येथे 60,352 गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती घ्या; योजनांचा लाभ घेऊन पशुपालन व्यवसायाला चालना द्या : पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. दीपाली भुतकरसरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे ११ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट : अध्यक्ष नवीद मुश्रीफआंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा दिन: महत्त्व आणि उद्दिष्टकोल्हापुरात गौरी-गणपती विसर्जन: पर्यावरणपूरक उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसादराज्यपाल निवासस्थानातील गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन; मातीत कडुलिंबाचे रोप लावणारजम्मू येथे ‘लोककलेतील श्रीगणेश’मधून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जागर‘अमृत-2’ अंतर्गत सर्व कामे मार्चअखेर पूर्ण करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जाहिरात

 

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे शुक्रवारपासून राष्ट्रीय कार्यशाळा

schedule24 Jan 26 person by visibility 426 categoryशैक्षणिक

▪️‘एक्स्पेरिमेंटल ॲनिमल हँडलिंग अँड एन्व्हायरन्मेंटल एनरिचमेंट’ बाबत मार्गदर्शन 

कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापिठाच्यावतीने डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे  ३० व ३१ जानेवारी २०२६ रोजी  ‘एक्स्पेरिमेंटल ॲनिमल हँडलिंग अँड एन्व्हायरन्मेंटल एनरिचमेंट’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील प्रायोगिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य शाखा यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत असून, डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज तसेच सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च, कदमवाडी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आय. क्यू. ए. सी. उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आली आहे. 

प्री-क्लिनिकल संशोधन, प्रयोगशाळेतील प्राणी विज्ञान, प्रायोगिक प्राण्यांचे नैतिक हाताळणी तत्त्वज्ञान,  तसेच पर्यावरणीय समृद्धी यासंबंधी अद्ययावत, वैज्ञानिक व व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांमध्ये आणि संशोधकांमध्ये विकसित करणे हा या राष्ट्रीय कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. 

कार्यशाळेत फार्माकोलॉजी विषयातील नामवंत व अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थित राहणार असून, यामध्ये डॉ. नीरज व्यवहारें (पुणे), डॉ. व्यंकट रमण (हैदराबाद), डॉ. सी. आर. पाटील (धुळे), डॉ. आर. वाय. पाटील (सोलापूर), डॉ. प्रल्हाद वांगिकर (पुणे), डॉ. विश्वेश डांगे (पुणे) तसेच डॉ. संदीप पाटील (सांगली) यांचा समावेश आहे. हे तज्ज्ञ प्री-क्लिनिकल व प्रायोगिक संशोधनातील महत्त्वाच्या विषयांवर विशेष व्याख्याने व प्रत्यक्ष प्रशिक्षण देणार आहेत.

ही कार्यशाळा पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक तसेच औद्योगिक क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी खुली असून, प्रायोगिक व प्री-क्लिनिकल संशोधनात कार्यरत असणारे  किंवा स्वारस्य असणाऱ्यांसाठी ती उपयुक्त ठरणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. सी. एम. जंगमे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, सौ. सोनाली दिवटे, डॉ. प्रमोद भालेराव, डॉ. अभिनंदन पाटील, डॉ. अश्विनी काळे, डॉ. पूनम चौगुले, डॉ. अशोक थुल्लूरु व डॉ. संदीप कडशी हे समन्वयक म्हणून कार्य पाहत आहेत.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा व कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 

कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या सर्वांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असून, संशोधकांना प्रायोगिक प्राणी हाताळणी, संशोधनातील नैतिकता, पर्यावरणीय समृद्धी व प्रयोगशाळा प्राणी विज्ञानाशी संबंधित अद्ययावत वैज्ञानिक ज्ञान प्राप्त होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes