+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule25 Jul 24 person by visibility 601 categoryराज्य
कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचे थैमान सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना महापुराचा फटका बसण्याची भीती आहे. अशावेळी महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी, कर्नाटकातील अलमट्टी धरणातून किमान 3 लाख क्युसेकने पाणी विसर्ग सुरू करणे आवश्यक आहे. तसेच संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने तातडीने एक उच्चस्तरीय समिती नेमावी आणि महाराष्ट्र कर्नाटक मधील जलसंपदा खात्यांच्या अधिकाऱ्यांत समन्वय ठेवावा, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी आज केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार सी आर पाटील यांच्याकडे केली. त्याबद्दलचे पत्र खासदार महाडिक यांनी नामदार पाटील यांच्याकडे नवी दिल्लीमध्ये सुपूर्द केले.  

राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यावर स्वयंचलित दरवाजे खुले होतात आणि कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचे संकट गंभीर बनते. अशावेळी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून किमान तीन लाख क्यूसेकने पाणी विसर्ग केला, तरच कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाण्याची फुग कमी होते. महापुराचे संकट टाळण्यासाठी आणि जीवित व वित्त हानी रोखण्यासाठी, तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. त्यासाठी अलमट्टीतून पाणी विसर्ग वाढवणे आणि उच्चस्तरीय समिती नेमून, तत्काळ करावयाच्या उपायोजना आणि दीर्घकालीन उपाय योजना तसेच पूरग्रस्तांचे पुनर्वसन आणि नुकसान भरपाई याबाबत धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचे खासदार महाडिक यांनी निवेदनात नमूद केले आहे. 

केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार सी आर पाटील यांनी खासदार महाडिक यांच्या मागणीची गांभीर्याने नोंद घेतली असून, पश्चिम महाराष्ट्रातील महापुराचे संकट रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील, असे अभिवचन दिले आहे.