SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भक्ती आणि उत्साहाचा सोहळा! कोल्हापुरात करवीरनिवासिनी अंबाबाईचा रथोत्सव मोठ्या उत्साहात राज्यात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; अमोल येडगे छत्रपती संभाजीनगरचे नवे महापालिका आयुक्तवादळी वाऱ्यामुळे मुख्य वीज वाहिनी बाधित; काळम्मावाडी योजनेचा पाणीपुरवठा तात्पुरता विस्कळीतकोल्हापूर महापालिकेला आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांची पुण्यात बदली, डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडे धुरा!शिवाजी विद्यापीठाच्या विकासासाठी ५० कोटींचा निधी तातडीने द्या; खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय मंत्र्यांकडे आक्रमक मागणीकोल्हापूरचे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांची तडकाफडकी बदली; मंत्रालयात हजर होण्याचे 'एकतर्फी' आदेश'राष्ट्रवादी'मध्ये कोणताही संघर्ष नाही; महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर आमचाच दावा : मंत्री हसन मुश्रीफदुधगंगा डावा कालव्यातील नादुरुस्त गेट दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण होणार‘गोकुळ’मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरीअवैध प्रवासी वाहतुकीवर आळा घालण्यासाठी कडक भूमिका घेणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

जाहिरात

 

राज्यात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; अमोल येडगे छत्रपती संभाजीनगरचे नवे महापालिका आयुक्त

schedule02 Apr 26 person by visibility 119 categoryराज्य

मुंबई: राज्य शासनाने गुरुवारी प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, यामध्ये कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची बदली छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांच्या स्वाक्षरीने हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. अमोल येडगे हे आता श्री. जी. श्रीकांत यांची जागा घेतील. विशेष म्हणजे, अमोल येडगे यांच्या रिक्त जागी कोल्हापूरचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून डॉ. विजय राठोड (भाप्रसे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शासकीय आदेशानुसार, अमोल येडगे यांनी आपल्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार डॉ. विजय राठोड यांच्याकडे सोपवून छत्रपती संभाजीनगरमधील आपला नवीन पदभार त्वरित स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत. या बदली प्रक्रियेनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी 'सुप्रिमो' प्रणालीवर आपली माहिती अद्ययावत करावी आणि गोपनीय अहवाल विहित वेळेत सादर करावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच नवीन पदस्थापनेत 'ई-ऑफिस' आणि 'e-HRMS' प्रणालीचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्यास सांगण्यात आले आहे. या बदल्यांची प्रत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयासह संबंधित विभागीय आयुक्तांना माहितीसाठी पाठवण्यात आली आहे. या फेरबदलामुळे छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या दोन्ही महत्त्वाच्या शहरांना आता नवे प्रशासकीय नेतृत्व मिळाले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes