SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आचारसंहितेसंदर्भातील प्रस्तावांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीमहापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांसाठी उत्तम दर्जाच्या सुविधा पुरवाव्यात : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेपुण्यातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारामध्ये मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी चौकशीसाठी समितीसरळसेवा भरतीसाठी अर्ज करण्यास 26 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढविनापरवाना आरायंत्र व मशिनवर वनविभागाची कारवाई23 नोव्हेंबरला महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षाआदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करत निष्पक्ष, पारदर्शक वातावरणात प्रक्रिया राबवा : जिल्हाधिकारी अमोल येडगेधैर्यशील भोसलेची चेन्नई येथील ऑल इंडिया युनिव्हर्सिटी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडबिहार विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू, , मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरणजिल्ह्यात शिदेसेनेला चांगले यश मिळेल : एकनाथ शिंदे; शिंदेसेनेच्या गटप्रमुखांचा कोल्हापुरात मेळावा

जाहिरात

 

भाजप कोल्हापूरच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त 'एकता पदयात्रा' उत्साहात

schedule31 Oct 25 person by visibility 209 categoryसामाजिक

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त 'एकता पदयात्रा' संपन्न झाली. सकाळी ७:३० पासून दसरा चौक याठिकाणी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र येत ही पदयात्रा मान्यवरांच्या उपस्थितीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचंड उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात सुरवात झाली. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, प्र.का.सदस्य राहूल चिकोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. छ.शिवाजी पेठ येथील हिंद प्रतिष्ठान मर्दानी खेळाचा आखाड्याच्या वतीने दांडपट्टा, काठीचे खेळ इत्यादी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके यावेळी सादर केली. 

तिरंगा ध्वज घेऊन या एकता पदयात्रेला सुरवात झाली. दसरा चौक – आईसाहेब महाराज पुतळा – बिंदू चौक – छ. शिवाजी रोड मार्गे हि पदयात्रा छ.शिवाजी महाराज चौक येथे पोचली. यानंतर खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

या एकता पदयात्रेत भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत सर्वांनी एकजुटीने देशाची एकता आणि अखंडता जपण्याचा संकल्प केला. 

जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव यांनी देशहिताच्या महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेणारे सरदार वल्लभभाई पेटल हे लोहपुरुष असून अखंड भारत निर्माण करण्याचे श्रेय सरदार वल्लभाई पटेल यांना जात असल्याचे नमूद करत त्यांना अभिवादन केले.  

याप्रसंगी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले, सरदार पटेल यांच्या दूरदृष्टीमुळेच भारताला एकसंध राष्ट्र म्हणून ओळख मिळाली. त्यांच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानाला वंदन करण्यासाठी आणि त्यांच्या 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. या पदयात्रेने राष्ट्रीय एकात्मतेचा आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाचा संदेश सर्वदूर पोहोचवला जात आहे.  अमूल सारख्या संस्थांची मुहूर्तमेढ रोवून तीन कोटीहून अधिक महिला या सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सहकाराशी जोडले गेलेले आहेत असे अनेक निर्णय त्यांनी घेतले त्यामुळे त्यांचा सन्मान यापूर्वीच  व्हायला पाहिजे होता परंतु कॉंग्रेस सरकारच्या काळात या देशावर अनेक वर्ष काँग्रेसचे राज्य असल्यामुळे योग्य तो त्यांचा सन्मान झाला नाही. 2014 नंतर प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर गुजरात मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात मोठा आणि सर्वात पुतळा गुजरात मध्ये बसवण्यात आलेला आहे पर्यटक आज एवढ्या मोठ्या प्रमाणात या स्मारकाला भेट देऊन त्यांना अभिवादन करतात. भविष्यामध्ये सुद्धा आज त्यांच्या नावाने अनेक योजना सुरू आहेत त्यांच्या नावाने काही न्यास काही बीट निर्माण करण्याचे काम सुद्धा भारतीय जनता पार्टी वतीने होत असल्याचे नमूद केले.
 
याप्रसंगी बोलताना आमदार अमल महाडिक म्हणाले, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली, भाजपा केवळ विकासच नव्हे, तर भारताच्या गौरवशाली संस्कृती आणि मूल्यांचे जतन करण्यासाठीही कटिबद्ध आहे. या पदयात्रेने समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या 'अंत्योदया'च्या संकल्पनेला बळकटी दिली. कोल्हापूर भाजपने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदर्शांना पुन्हा एकदा उजाळा देत, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश घराघरात पोहोचवला.

याप्रसंगी अमर साठे, विराज चिखलीकर, हेमंत आराध्ये, विजय सूर्यवंशी, राजसिंह शेळके, विजय खाडे, माधुरी नकाते, भरत काळे, अप्पा लाड, विजय अगरवाल, गिरीश साळोखे, हेमंत कांदेकर, अमोल पालोजी, विश्वजित पवार, आजम जमादार, अतुल चव्हान, दिग्विजय कालेकर, दीपक काटकर, संतोष भिवटे, संतोष माळी, रविकिरण गवळी, विनय खोपडे, सचिन कुलकर्णी, राजगणेश पोळ, प्रीतम यादव, विशाल शिराळकर, महेश यादव, संजय जासूद, सचिन सुराणा, रविंद्र मुतगी, संदीप पोवार, अरविंद वडगांवकर, सयाजी आळवेकर, किरण नकाते, प्रणोती पाटील, सुजाता पाटील, संतोष जाधव, राजेश कोगनुळकर, अविनाश कुंभार, शाहरुख गडवाले, योगेश ओटवकर, वंदना बंबलवाड, सुनीता घोडके, समयश्री अय्यर, प्रशांत आवघडे, संजय सावंत, सुहास सदलगे, शिवप्रसाद घोडके, किरण कुलकर्णी, सचिन घाटगे, महेश चौगले, विवेक कोरडे, सुनील वाडकर, प्रवीणचंद्र शिंदे, रणजीत औंधकर, राहुल घाटगे, दिलीप बोंद्रे, दत्तात्रय म्हसवेकर, अशोक लोहार, सतीश आंबर्डेकर, जयेश घरपणकर, सचिन जाधव, वीरेंद्र मोहिते, सनी आवळे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes