23 नोव्हेंबरला महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा
schedule06 Nov 25 person by visibility 59 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) -2025 रविवार, 23 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे.
परीक्षेसाठी बंगाली, कन्नड, तेलगु, गुजराती माध्यमांच्या विद्यार्थी, उमेदवारांची राज्यामध्ये एकूण संख्या कमी प्रमाणात असल्याने संबंधित सर्व विद्यार्थी, उमेदवारांचे परीक्षा केंद्र उपलब्ध करण्यात येत असून याची संबंधित सर्व विद्यार्थी, उमेदवारांनी नोंद घ्यावी,
असे अवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.