SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूरी गुळ जगभरात पोहोचण्यासाठी जीआय नोंदणी करा : डॉ. सुभाष घुलेकोल्हापूर येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा आढावा; राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचनाडॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला 'व्हेरी गुड' श्रेणीडी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार : डॉ. संजय डी. पाटील; विद्यापीठाचा पाचवा स्थापना दिवस उत्साहात साजराडी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे ''राष्ट्रीय डॉक्टर डे' उत्साहात; कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याकडून शुभेच्छाशक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारु नका : सतेज पाटील विधानपरिषदेत कडाडले जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारी 7 जुलै रोजीविमा योजनेतील भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कधी कारवाई करणार ; सतेज पाटील यांचा सवाल : महिन्याच्या आत कारवाईचे कृषीमंत्र्यांचे आश्वासनशिवाजी विद्यापीठात वसंतराव नाईक जयंती उत्साहातहज यात्रेकरू कोल्हापुरात दाखल !! हज फाऊंडेशन आणि लिम्रास ट्रस्टच्यावतीने जोरदार स्वागत

जाहिरात

 

‘इमर्जन्सी’ चित्रपटातून ऐतिहासिक मागोवा :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

schedule16 Jan 25 person by visibility 337 categoryमनोरंजन

  मुंबई : ‘इमर्जन्सी’ चित्रपटातून आणिबाणीच्या काळातील ऐतिहासिक मागोवा घेण्यात आला असून या कालावधीतील घटनाक्रम अचूकपणे टिपण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

   ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन ‘बीकेसी’तील पीव्हीआर येथे करण्यात आले. यावेळी चित्रपटाच्या नायिका कंगना राणावत, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, चित्रपटाची संपूर्ण टीम आणि प्रेक्षक उपस्थित होते.

   मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, आणीबाणीच्या कालावधीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बाजूला ठेवण्यात आले. मात्र ही घटना देशाच्या प्रत्येक नागरिकांस माहिती होणे आवश्यक आहे. आणीबाणीच्या कालखंडात नागरिकांचे अधिकार काढून घेण्यात आले होते. लोकशाहीवरील या संकटाची माहिती देशातील नागरिकांना कळणे गरजेचे आहे, असेही प्रतिपादन श्री.फडणवीस यावेळी केले.

   अभिनेत्री कंगना राणावत यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी यांची भूमिका अतिशय उत्तम रंगवली असल्याचेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes