SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्हा सराफ सुवर्णकार संघाचा २८ मार्च रोजी जिल्हास्तरीय मेळावा; व्यवसायातील आव्हानांवर होणार 'मंथन'डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा 'इंपल्स 2026' संपन्नकणेरी मठात रंगणार १७ राज्यांतील कलाकारांचा 'सिद्धगिरी कारागीर महाकुंभ'; ३१ मार्चपासून महासोहळ्याला सुरुवातमुंबईतील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋषिकेश कबनुरकरचा डंका; पटकावला पाचवा क्रमांक!‘पल्स’ वैद्यकीय परिषदेमुळे आरोग्यव्यस्थेचा पाया अधिक बळकट : मंत्री हसन मुश्रीफ मोरारजी देसाई: भारताचे पहिले बिगर-काँग्रेस पंतप्रधानसुदृढ तरुण हाच विकसित भारताचा शिल्पकार: जिल्हाधिकारी अमोल येगडेपावनखिंड परिसरात 'मेरा युवा भारत' तर्फे स्वच्छता श्रमदानपेट्रोल-डिझेल साठेबाजी व काळाबाजारावर कडक बंदी; नियमभंग करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईप्रवाशांची तृष्णा भागणार! वाठार बस डेपोत सामाजिक भावनेतून 'पाणपोई' कार्यान्वित

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्हा सराफ सुवर्णकार संघाचा २८ मार्च रोजी जिल्हास्तरीय मेळावा; व्यवसायातील आव्हानांवर होणार 'मंथन'

schedule25 Mar 26 person by visibility 148 categoryउद्योग

कोल्हापूर : गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ सराफ आणि सुवर्ण कारागिरांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या 'कोल्हापूर जिल्हा सराफ सुवर्णकार संघा'च्या वतीने येत्या २८ मार्च रोजी भव्य जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मार्केट यार्डातील लोटस बँक्वेट हॉल येथे सकाळी ११ ते २ या वेळेत हा मेळावा संपन्न होईल, अशी माहिती संघाचे जिल्हाध्यक्ष आणि नामवंत सराफ अमोल ढणाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

फत्तेसिंग रांका आणि सुरेंद्र पुरवंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या या संघाचे सध्या कोल्हापुरात अडीच हजार सदस्य आहेत.


या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे नाशिकचे नामवंत सराफ अनिल दंडे आणि सुरेंद्र पुरवंत यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. मेळाव्यामध्ये सध्या सराफ व्यवसायासमोर उभी असलेली गंभीर आव्हाने, जसे की सोने-चांदीच्या दरातील अनपेक्षित वाढ, व्यावसायिकांवर होणारे प्राणघातक हल्ले, वाढत्या चोऱ्या आणि मोठ्या पेढ्यांच्या स्पर्धेमुळे अडचणीत आलेले छोटे व्यावसायिक, या विषयांवर सखोल विचारमंथन केले जाणार आहे. याशिवाय, आगामी आर्थिक वर्षाचे नियोजन आणि 'स्टॉक मॅनेजमेंट' या तांत्रिक विषयांवरही चर्चा होईल.

 मेळाव्यात मंजूर करण्यात आलेले महत्त्वाचे ठराव केंद्र आणि राज्य सरकारकडे पुढील अंमलबजावणीसाठी पाठवले जाणार आहेत. या पत्रकार परिषदेला पांडुरंग कुंभार, अमर गोडबोले, अविनाश मुखरे आणि सचिन देवरुखकर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes