कळंबा : ग्रामदैवत श्री महालक्ष्मी, अंबाबाई देवीच्या उत्सवानिमित्त सुमारे १८ हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
schedule15 May 26 person by visibility 118 categoryसामाजिक
कळंबा : येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी, अंबाबाई देवीच्या उत्सवानिमित्त आज १५ मे रोजी सकाळी नऊ वाजता श्री महालक्ष्मी मंदिरात श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. मान्यवरांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आला. आज झालेल्या महाप्रसादाचा सुमारे १८ हजार भाविकांनी लाभ घेतला.
ग्रामदैवत श्री महालक्ष्मी, अंबाबाई देवीच्या उत्सवानिमित्त आज अशोक गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली देवीची महापूजा बांधली. तर सत्यनारायणाची पूजा श्री व सौ संग्राम जाधव यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
काल गुरुवारी होम हवन घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य करण्यात आला होता. तसेच दुपारी महिलांसाठी कुंकुमार्चन सोहळा उत्साहात पार पडला, रात्री हनुमान भेटीचा मुख्य पालखी सोहळा मोठ्या भक्ती भावामध्ये पार पडला.
यावेळी लोकनियुक्त सरपंच सुमन विश्वास गुरव, उपसरपंच रोहित जगताप, माजी सरपंच विश्वास गुरव, माजी सरपंच सागर भोगम, शशिकांत तिवले, अण्णासाहेब बराले, आदींच्या हस्ते महाप्रसाद वाटपास प्रारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य उदय जाधव, पुनम जाधव, रोहित उर्फ राहूल मिरजे, संदिप पाटील, विकास पोवार, दिपक तिवले. स्वरुप पाटील, नितीश शिंदे, श्रीमती भाग्यश्री पाटोळे, वैशाली टिपुगडे, छाया भवड, मिना गौड, दिपाली रोपळकर, स्नेहल जाधव, आशा टिपुगडे, संगीता माने, तसेच उत्तम जाधव, प्रकाश पाटील -टोपकर, तानाजी पाटील, विश्वास खानविलकर, संभाजी पवार बावडेकर, दिलीप टिपुगडे, धनाजी चौगुले , उदय सुतार, तानाजी साळुंखे, विनायक माने, भगवान पाटील, अरुण टोपकर, रणजीत कोंडेकर, तानाजी पाटील श्री महालक्ष्मी अंबाबाई भक्तगण मंडळ सदस्य, ग्रामस्थ, महिला, गावातील तरुण मंडळाचे सदस्य आदी यावेळी उपस्थित होते,