शिरढोण येथील आरोग्य शिबिरात २९७ नागरिकांची तपासणी
schedule27 Oct 26 person by visibility 151 categoryआरोग्य
शिरढोण : सहकारमहर्षी स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिरोळ तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या मोफत आरोग्य व नेत्र तपासणी अभियानांतर्गत शिरढोण येथे आयोजित आरोग्य शिबिरात २९७ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य अभियानातील आजअखेर लाभार्थ्यांची संख्या ११ हजार ५०० वर पोहोचली आहे.
आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन आणि शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, यड्राव यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, विविध आजारांचे वेळेत निदान करणे आणि आरोग्याविषयी जनजागृती करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
शिरोळ तालुक्यातील विविध गावांमध्ये या अभियानांतर्गत आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येत असून, त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. या माध्यमातून नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध होत आहे.
शिरढोण येथील शिबिरप्रसंगी पंचायत समितीच्या उपसभापती मनीषा कदम, बाबुराव कोईक, विश्वास बालीघाटे, विद्यासागर पाटील, अक्षय पाटील, रूपचंद शिंदे, विलास चौगुले, प्रमोद कांबळे, सचिन कोईक, सूर्यकांत कोळी, किरण कोईक, बापूसो मालगावे, शितल खंजिरे, यशवंत कुंभार, कुमार चौगुले, अजित चौगुले, मोहम्मदअली मुजावर, रावसो यमकनमर्डे, असलम मुजावर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.