SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्याची विशेष मोहीमविनापरवाना व्यवसाय व घरफाळा थकबाकीप्रकरणी शहरातील 11 आस्थापने सीलकोल्हापूर : अनधिकृत फटाका विक्री केल्यास २ हजार रुपये दंड; फटाका स्टॉलसाठी निश्चित केलेल्या जागेवरच विक्रीस परवानगीगांधीनगर बाजारपेठेत दिवाळीत भारनियमन नको; करवीर शिवसेनेचा महावितरणला इशारा‘केआयटी’त सायबर सुरक्षा विषयात विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षेचे धडे‘गोकुळ’ची कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विक्रमी २१ लाख ७० हजार लिटर दूध विक्री!शिरढोण येथील आरोग्य शिबिरात २९७ नागरिकांची तपासणीजागतिक दृश्य-श्राव्य वारसा दिन: महत्त्व आणि जतनाची गरजशरद सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, उपाध्यक्षपदी पोपट भोकरे यांची निवड२६ ऑक्टोबर १९४७: जम्मू आणि काश्मीरचा भारतात ऐतिहासिक विलय

जाहिरात

 

कोल्हापूर : अनधिकृत फटाका विक्री केल्यास २ हजार रुपये दंड; फटाका स्टॉलसाठी निश्चित केलेल्या जागेवरच विक्रीस परवानगी

schedule27 Oct 26 person by visibility 131 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात व जिल्ह्यात फटाक्यांची विक्री करताना शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. फटाके हे अतिज्वलनशील व विस्फोटक स्वरूपाचे असल्याने अनधिकृतपणे फटाका विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून २ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच संबंधित फटाके जप्त करण्यात येणार असल्याची सूचना कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

शहर व सलग्न ग्रामीण परिसरात दिवसेंदिवस आग व आपत्तीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच नुकतीच हिंगोली शहरातील फटाका दुकानाला आग लागून जीवित व वित्तहानी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी दिवाळी सणासाठी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. फटाका विक्री करताना मा. उच्च न्यायालयाचे आदेश, नगरविकास विभाग तसेच गृह विभागाच्या सूचनांनुसार आणि विस्फोटक नियम २००८, पर्यावरणविषयक नियम व इतर लागू कायदेशीर तरतुदींनुसार कार्यवाही करणे बंधनकारक आहे.

मा. उच्च न्यायालयाने दि. १७ व २५ ऑक्टोबर २०१६ रोजी दिलेले आदेश आणि शासन निर्णय दि. ११ मे २०१६ अन्वये फटाक्यांची विक्री व वापरासाठी स्थानिक प्रशासनाने निश्चित केलेल्या जागांचे नियम पाळणे आवश्यक आहे. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिकेने आगामी दिवाळीसाठी किरकोळ फटाका विक्रीचे स्टॉल लावण्याकरिता निश्चित जागा ठरविल्या आहेत. या निश्चित केलेल्या जागांव्यतिरिक्त शहरात अन्यत्र फटाका स्टॉल लावण्यास परवानगी दिली जाणार नाही.

त्यामुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सर्व नागरिक, परवानाधारक फटाका विक्रेते, व्यापारी व संबंधित घटकांनी नियमांचे पालन करावे. अनधिकृतपणे फटाका विक्री करणाऱ्या व्यक्ती व घटकांवर विस्फोटक नियम तसेच महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियमातील लागू तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल. यामध्ये २ हजार रुपये दंड आकारणी व फटाके जप्त करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes