SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळ दूध संघ निवडणूक : आमदार सतेज पाटील यांनी गगनबावडा येथे बजावला मतदानाचा हक्कजागतिक रजोनिवृत्ती दिन: महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकतासेवा संकल्प अभियाना अंतर्गत उप जिल्हा रुग्णालय गांधीनगर येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम कोल्हापूर मार्फत 'फोकस ग्रुप डिस्कशन' चे आयोजनसोलापुरात कौस्तुभ गावडे यांची प्रचारात आघाडी; कौस्तुभ गावडे यांना शिक्षक आणि शिक्षण संस्थांचा वाढता पाठिंबा!पात्र शाळा व वाढीव तुकड्यांना वेळेत अनुदान मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार; सर्व पात्र संस्थांना १००% पूर्ण अनुदान मिळावे यासाठी आग्रही राहणार : शिक्षकमित्र कौस्तुभ गावडेशारंगधर देशमुख यांच्या सोबतीने महायुती मजबूत : चंद्रकांतदादा पाटीलखासगी रुग्णालयांना सेवा-सुविधांचे दर ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारककर्करुग्णांसाठी मोठा दिलासा विस्तारित महात्मा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत PET-CT स्कॅनचा समावेशपदवीधर, शिक्षक उमेदवारांच्या प्रचारासाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा घरोघरी संपर्ककौशल्यातूनच जागतिक नेतृत्व शक्य : प्रा. डॉ. भीमराया मेत्री

जाहिरात

 

नगरोत्थानच्या रस्त्यावर पाणी पुरवठा व ड्रेनेज लाईन कनेक्शनसाठी 3 दिवसांची मुदत

schedule20 May 24 person by visibility 1107 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महाराष्ट्र सुवर्ण जंयती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजनेअंतर्गत चार रस्त्यांची कामे सुरु आहेत. यामध्ये सुरु असलेल्या कामापैकी न केलेल्या रस्त्याच्या उर्वरीत भागावर जर कोणाला पाणी पुरवठा व ड्रेनेज लाईन कनेक्शनसाठी 3 दिवसाची मुदत देण्यात आली आहे. यामध्ये संबंधीतांनी महापालिकेच्या शहर पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधुन रितसर मंजुरी घेऊन पाणी पुरवठा व ड्रेनेज लाईन टाकणेची कार्यवाही करण्यात यावी. 

रस्त्याचे काम पुर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा व ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात येणार नाही याची सर्व संबंधीत नागरीकांनी नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

  यामध्ये दसरा चौक ते बिंदु चौक ते खासबाग ते मिरजकर तिकटी ते नंगीवली चौक इंदिर सागर हॉटेल चौक, प्रभाग क्र.69 समाधान हॉटेल ते आय.टी.आय.कॉर्नर, सुभाष रोड (‘60’ वाईड डी.पी) ते भोसले हॉस्पीटल, राजारामपुरी माऊली चौक ते हुतात्मा चौक ते गोखले कॉलेज चौक कन्हैया सर्विसिंग सेंटर ते विश्वजित हॉटेल, प्र.क्र.47 खरी कॉर्नर चौक ते गांधी मैदान चौक ते निवृत्ती चौक ते उभा मारुती चौक इत्यादी भागाचा समावेश आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes