दत्तवाडच्या आरोग्य शिबिरात ३२० नागरिकांची तपासणी
schedule29 Nov 26 person by visibility 132 categoryआरोग्य
◼️१७ जणांवर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया; आरोग्य अभियानातील लाभार्थ्यांची संख्या १९ हजार १९ वर
दत्तवाड : ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सहकारमहर्षी स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिरोळ तालुक्यात सुरू असलेल्या मोफत आरोग्य व नेत्र तपासणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दत्तवाड येथे आयोजित आरोग्य शिबिरात एकूण ३२० नागरिकांची आरोग्य व नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये १८० नागरिकांची नेत्र तपासणी, तर १४० नागरिकांची बीपी, शुगर व जनरल आरोग्य तपासणी करण्यात आली. नेत्र तपासणीदरम्यान १७ जणांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन आणि शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, यड्राव यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच मोफत आरोग्य व नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध होत असल्याने या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दत्तवाड येथील शिबिरातील लाभार्थ्यांची भर पडल्याने या आरोग्य अभियानातील आजअखेर लाभार्थ्यांची एकूण संख्या १९ हजार १९ वर पोहोचली आहे.
यावेळी बबन चौगुले, प्रकाश चौगुले, नूर काले, नाना नेजे, अभयकुमार चौगुले, बाळकृष्ण चौगुले, जयपाल सिद्धनाळे, संजय पाटील, महावीर नेजे, बाबासो हिंगमिरे, बसगोंडा पाटील, बाळासो पोवडी, प्रभू चौगुले, चंद्रकांत कांबळे, दादासो कांबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.