SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली; राधानगरी धरणात 5.07 टीएमसी पाणीसाठामातृ सुरक्षा दिन: मातृत्व जपण्याचा संकल्प'क्लायमेट सत्याग्रह' जनतेच्या माध्यतातून पुढे जाणे आवश्यक - प्रा.चेतन सिंह सोलंकीगंजीगल्ली परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाईकल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचा मिल राेलर पूजनकोल्हापुरात शिक्षकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चावाशी येथे 'स्वामी क्लिनिक'चा भव्य शुभारंभ; माफक दरात मिळणार आरोग्य सेवाडी. वाय.पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या एमबीए विद्यार्थ्यांचा आयआयएम तिरुचिरापल्ली येथे डोमेस्टिक इमर्शन प्रोग्राम संपन्नस्ट्रक्चरल इंजिनिअर्सना आता हवी व्यावसायिक सुरक्षा; महाबळेश्वर येथे राज्यस्तरीय बैठकीत ठरावनवनिर्वाचित नगरसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेस उत्साहात प्रारंभ

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली; राधानगरी धरणात 5.07 टीएमसी पाणीसाठा

schedule10 Jul 26 person by visibility 90 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 5.07 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून  पाण्याचा विसर्ग निरंक आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, हळदी, खडक कोगे व राशिवडे,  तुळशी नदीवरील- कसबा बीड,  कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, पुनाळ तिरपण, बाजार भोगांव, वालोली व पेंडाखळे, कुंभी नदीवरील- सांगरुळ, वारणा नदीवरील- कोडोली, मांगलेसावर्डे, खोची, शिगाव, चावरे व दानोळी, दूधगंगा नदीवरील- सिध्दनेर्ली, दत्तवाड, सुळकूड व बाचणी, वेंदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापुर व सुरुपली, ताम्रपर्णी नदीवरील -चंदगड, कोतेवाडी व कोकरे असे एकूण 38 बंधारे पाण्याखाली आहेत.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 5.07 टीएमसी, तुळशी 1.93 टीएमसी, वारणा 20.18 टीएमसी, दूधगंगा 7.54 टीएमसी, कासारी 1.54 टीएमसी, कडवी 1.39 टीएमसी, कुंभी 1.36 टीएमसी, पाटगाव 1.75 टीएमसी, चिकोत्रा 0.60 टीएमसी, चित्री 1.04 टीएमसी, जंगमहट्टी 0.79 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 0.92 टीएमसी, सर्फनाला 0.58 टीएमसी, धामणी 1.29 व कोदे ल.पा. 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 35.4 फूट, सुर्वे 35फूट, रुई 65.9 फूट, इचलकरंजी 62.3 फूट, तेरवाड 57 फूट, शिरोळ 53 फूट, नृसिंहवाडी 51.6 फूट, राजापूर 41 फूट तर नजीकच्या सांगली  24.6 फूट व अंकली 30.3 फूट अशी आहे.

⚫ जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 1.1 मिमी पावसाची नोंद; गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 9 मिमी पाऊसाची नोंद
कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 9 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- 0.3 मिमी, शिरोळ -0.1 मिमी, पन्हाळा- 0.4 मिमी, शाहुवाडी- 0.9 मिमी, राधानगरी- 0.5 मिमी, गगनबावडा- 9 मिमी, करवीर- 0.3 मिमी, कागल- 0.2 मिमी, गडहिंग्लज- 0.3 मिमी, भुदरगड- 0.2 मिमी, आजरा- 0.7 मिमी, चंदगड- 0.3 मिमी, असा एकूण 1.1 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes