वाशी येथे 'स्वामी क्लिनिक'चा भव्य शुभारंभ; माफक दरात मिळणार आरोग्य सेवा
schedule09 Jul 26 person by visibility 410 categoryशैक्षणिक
कोल्हापूर: राधानगरी रोडवरील वाशी येथे डॉ. अनिकेत रासकर आणि डॉ. शिवानी सार्वे-रासकर यांच्या 'स्वामी क्लिनिक' या नवीन डे-केअर सेंटरचा उद्घाटन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. ८ जुलै रोजी ज्ञानेश्वर सार्वे आणि विनायक कुलकर्णी यांच्या हस्ते, तर अशोक चौगुले आणि अरुण कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत या क्लिनिकचे विधिवत उद्घाटन करण्यात आले.
वाशी आणि परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. माफक दरात उच्च दर्जाची रुग्णसेवा पुरवणे, हे या केंद्राचे मुख्य उद्दिष्ट आहे. डॉ. अनिकेत आणि डॉ. शिवानी रासकर यांची ही तिसरी शाखा असून, यापूर्वी त्यांची 'नवजीवन क्लिनिक' (क्रांतिसिंह नाना पाटील नगर) आणि 'आयुष क्लिनिक' (शिंगणापूर) ही केंद्रे कार्यरत आहेत.
या उद्घाटन प्रसंगी वाशी गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.