SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
वाशी येथे 'स्वामी क्लिनिक'चा भव्य शुभारंभ; माफक दरात मिळणार आरोग्य सेवाडी. वाय.पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या एमबीए विद्यार्थ्यांचा आयआयएम तिरुचिरापल्ली येथे डोमेस्टिक इमर्शन प्रोग्राम संपन्नस्ट्रक्चरल इंजिनिअर्सना आता हवी व्यावसायिक सुरक्षा; महाबळेश्वर येथे राज्यस्तरीय बैठकीत ठरावनवनिर्वाचित नगरसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेस उत्साहात प्रारंभराज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन १०८८ पदांची भरती प्रक्रिया सुरूकोल्हापूर जिल्ह्यातील 51 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 4.89 टीएमसी पाणीसाठाआजचा फॅशन डे: स्वतःच्या शैलीचा नवा आविष्कारमहाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती​‘त्या’ घटनेने पेठवडगाव सुन्न: भरदिवसा, भररस्त्यात पत्नीचा बळी; आरोपी पतीच्या शोधात पोलीसपंचगंगा घाट व शाहू मिल परिसराची महापौर रुपाराणी निकम यांच्याकडून पाहणी; आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश

जाहिरात

 

डी. वाय.पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या एमबीए विद्यार्थ्यांचा आयआयएम तिरुचिरापल्ली येथे डोमेस्टिक इमर्शन प्रोग्राम संपन्न

schedule09 Jul 26 person by visibility 151 categoryशैक्षणिक

  कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या एमबीए विद्यार्थ्यांचा तिरुचिरापल्ली येथील भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) येथे पाच दिवसीय डोमेस्टिक इमर्शन प्रोग्राम यशस्वीरीत्या संपन्न झाला. या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण व आधुनिक व्यवस्थापन पैलूंचे ज्ञान मिळवण्याची संधी मिळाली.

  या विशेष शैक्षणिक उपक्रमामध्ये आयआयएम तिरुचिरापल्लीच्या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना डिस्क्रिप्टिव्ह ॲनालिटिक्स, प्रेस्क्रिप्टिव्ह ॲनालिटिक्स, प्रेडिक्टिव्ह ॲनालिटिक्स, डिजिटल मार्केटिंग, आयपीओ अँड व्हॅल्युएशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), जनरेटिव्ह एआय, आंत्रप्रेन्युअरियल फायनान्स तसेच लीडरशिप एसेंशियल्स यांसारख्या समकालीन व्यवस्थापन विषयांवर मार्गदर्शन केले. याशिवाय इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) लॅबला भेट, उद्योगभेट, तज्ज्ञांशी संवाद, पीअर लर्निंग, नेटवर्किंग आणि कॅम्पस एक्स्पोजर यांसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना उद्योग आणि व्यवस्थापन क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यपद्धती समजून घेण्याची संधी मिळाली.

  या उपक्रमाचे आयोजन व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख डॉ. आसावरी यादव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. डॉ. पुरुषोत्तम पेटारे, डॉ. अर्पिता बिदनूरकर आणि श्री. व्यंकटेश बडवे यानी समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली.

  आयआयएम तिरुचिरापल्ली प्रा. ज्योतिमॉय दलाल आणि प्रा. गोपीनाथ के. यांनी कार्यक्रम संचालक म्हणून तसेच कॉर्पोरेट रिलेशन्स अँड फॅकल्टी अफेअर्सचे अधिष्ठाता प्रा. पी. सारवनन, एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन अँड कन्सल्टन्सीचे अध्यक्ष प्रा. गजानंद एम. एस., कॉर्पोरेट रिलेशन्स ऑफिसर (सीआरओ) श्री. सेंथिल सरवणन तसेच ईईसी विभागाच्या संपूर्ण टीमने कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.

  या कार्यक्रमात प्रा. अरुलानंद प्रभू, प्रा. गोपीनाथ के., प्रा. ज्योतिमॉय दलाल, प्रा. वेंकटराघवन कृष्णस्वामी, प्रा. सतीश एस. महेश्वरप्पा, प्रा. मुकुंदन के. व्ही., प्रा. बिपिन दीक्षित, प्रा. गजानंद एम. एस. आणि प्रा. पापरी नाथ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

  डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक प्रा. डॉ. अजित पाटील, डी. वाय. पाटील स्कूल ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स अँड बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे संचालक प्रा. डॉ. ए. एम. गुरव, डेप्युटी रजिस्ट्रार अश्विन देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.

  कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील व पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes