SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बालकांच्या संविधानिक हक्कांवरील ‘कलरिंग बुक’चे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पणगोकुळ निवडणुकीत महायुतीच सरशी ठरणार; खासदार धनंजय महाडिकांचा दावाकोल्हापूर शहरातील ५३ रिक्षांवर कारवाई; २३ हजार ८०० रुपयांचा दंड वसूलआंतरराष्ट्रीय व्हेल शार्क दिन: सागरी महाकाय जीवांच्या संरक्षणाचा संकल्पआदिवासींनी केलेल्या बांबूच्या राख्यांना शिवाजी विद्यापीठात प्रतिसादगगनबावड्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आणि वसतिगृहामधील मुलींच्या हस्ते राखी बांधून कृष्णराज महाडिक यांनी केला अनोखा रक्षाबंधन सोहळामुंबईतील ३९ बालगृहांतील ६०० हून अधिक भाऊ-बहिणी रक्षाबंधनानिमित्र एकत्रउंचगाव येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप५ सप्टेंबरला रंगणार युवाशक्ती दहीहंडीचा थरार, पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य आणि लोकप्रिय युवाशक्ती दहीहंडीसाठी प्रथम क्रमांक विजेत्या संघाला ३ लाख रूपयांचे बक्षीसकागल तालुक्यातील सहा 'ब' वर्ग तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर

जाहिरात

 

बालकांच्या संविधानिक हक्कांवरील ‘कलरिंग बुक’चे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण

schedule30 Aug 26 person by visibility 47 categoryराज्य

मुंबई : न्याय संस्था आणि विधी सेंटर फॉर लीगल पॉलिसी यांच्यावतीने बालकांना त्यांच्या संविधानिक हक्कांची माहिती सहज, आनंददायी पद्धतीने मिळावी, यासाठी ‘प्रत्येक बालकाने जाणून घ्यावेत असे 18 मूलभूत हक्क’ हे बुक तयार करण्यात आले आहे. या कलरिंग बुकचे लोकार्पण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए), मुंबई येथे आयोजित कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डंगरे, माजी न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण, अनिशा गोपी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या वतीने राज्यात संविधान फेलोशिपचाही शुभारंभ करण्यात आला.

बालकांच्या हक्कांची माहिती त्यांना लहान वयापासूनच व्हावी, या उद्देशाने तयार करण्यात आलेले हे कलरिंग बुक मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या बुकमध्ये निवारा, पोषण, शिक्षण आणि मोफत कायदेशीर मदत यांसह बालकांच्या 18 महत्त्वपूर्ण हक्कांची माहिती देण्यात आली आहे. तसेच बालविवाह, बालमजुरी, रॅगिंग, बुलिंग आणि लैंगिक शोषण या विषयांचाही बालकांना समजेल अशा संवेदनशील पद्धतीने समावेश करण्यात आला आहे.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी शासन सदैव कटिबद्ध आहे. या प्रयत्नांना कल्पकतेतून बळ देणाऱ्या या कलरिंग बुकच्या माध्यमातून बालकांना त्यांच्या हक्कांची माहिती सहज आणि आनंददायी पद्धतीने मिळणार आहे. रंग भरताना बालकांच्या मनावर त्यांच्या हक्कांची जाणीव रुजण्यास मदत होणार असल्याचा आनंद आहे. तसेच संविधान फेलोशिपच्या माध्यमातून कायदे आणि संविधानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी संस्थेने घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण आहे.

कार्यक्रमादरम्यान धारावी ड्रीम प्रोजेक्ट यांच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. तसेच बालकांच्या हक्कांवर तयार केलेल्या रॅप गीताचे लोकार्पण करण्यात आले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes