SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
"युवकांनी एड्स मुक्तीचे दूत बनावे”पंचगंगा नदी परिसरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या कामांना गती द्या : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे लोकनृत्य महोत्सवातून राज्याच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा जागर प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे पालक सभा उत्साहात; विद्यार्थिनींच्या प्रगतीचे पालकांकडून कौतुकमहिला समानता दिन: समानतेच्या हक्काची आणि प्रगतीची नवी क्षितिजेसीमेवरील जवानांसाठी करवीरकर भगिनींची ओवाळणी: 'एक राखी' ठरतेय बारा हत्तींचे नैतिक बळ!पंचगंगा प्रदूषण करणाऱ्यांवर ठोस कारवाई करा : आमदार यड्रावकर ; पंचगंगा प्रदूषणासंदर्भात मुंबई मंत्रालयात बैठक संपन्न स्थानिक विकास निधीतून उचगावमध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ, उचगावच्या सर्वागिण विकासासाठी १ कोटी रूपयांचा निधी देणार, खासदार धनंजय महाडिक यांची ग्वाहीआमदार यड्रावकर यांचा पाठपुरावा : सरंजाम इनाम जमिनींचा प्रश्न मार्गी लागणार राज्यात खळबळ! धुमाकूळ घालणाऱ्या कुख्यात 'एस.पी. गँग'वर कोल्हापुरात पहिलीच MCOCA कारवाई; बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी व गर्भपाताचा गोरखधंदा चालवणाऱ्या ११ जणांच्या मुसक्या आवळल्या

जाहिरात

 

अमेरिका आणि इराणमधील २१ तासांची चर्चा निष्फळ; पश्चिम आशियातील शांतता प्रयत्नांना मोठा धक्का

schedule12 Apr 26 person by visibility 751 categoryविदेश

 नवी दिल्ली : पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे अमेरिका आणि इराण यांच्यात सलग २१ तास चाललेली उच्चस्तरीय चर्चा कोणत्याही ठोस कराराशिवाय निष्फळ ठरली आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वान्स यांनी आज सकाळी वार्ताहरांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली.

 त्यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेने इराणसमोर एक अत्यंत सकारात्मक प्रस्ताव ठेवला होता, परंतु इराणने आपल्या अटी मान्य करण्यास नकार दिल्यामुळे अमेरिकेला विनाकरार परतावे लागत आहे. इराणने अण्वस्त्र क्षमता बाळगू नये, हुती आणि हिजबुल्ला सारख्या संघटनांना दिला जाणारा पाठिंबा थांबवावा आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील आपले नियंत्रण हटवावे, अशा अमेरिकेच्या प्रमुख मागण्या होत्या. मात्र, अमेरिकेने या बदल्यात बँकांमध्ये गोठवलेला निधी परत देण्याचे आश्वासन देऊनही इराणकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.

दुसरीकडे, इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी या अपयशासाठी अमेरिकेच्या अवास्तव मागण्यांना जबाबदार धरले आहे. लेबनॉनवरील हल्ले त्वरित थांबवावेत, युद्धात झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, बँकांमधील संपत्ती मुक्त करावी आणि युरेनियम संवर्धनाचा पूर्ण अधिकार इराणला मिळावा, अशा मागण्या इराणने चर्चेदरम्यान केल्या होत्या. तसेच होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपलेच नियंत्रण असावे, या भूमिकेवर इराण ठाम होता, ज्याला अमेरिकेने कडाडून विरोध केला.

 विशेष म्हणजे, १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर दोन्ही देशांमध्ये झालेली ही पहिलीच उच्चस्तरीय चर्चा होती. या चर्चेत अमेरिकेकडून जेडी वान्स, स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुशनर, तर इराणकडून मोहम्मद बगेर, गादी खाफ आणि अब्बास अघारघची यांसारख्या दिग्गज नेत्यांनी सहभाग घेतला होता.
या चर्चेच्या अपयशानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अणुविषयक मुद्द्यांवर दोन्ही देशांचे एकमत झाले नसल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या आणि टोल न देणाऱ्या जहाजांना रोखले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेल पुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अमेरिकन नौदलाला कडक कारवाईचे आदेश देण्यात आले असून, समुद्रातील सुरुंग हटवण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. या घडामोडींमुळे पश्चिम आशियातील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes