SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महिला व बाल कल्याण समितीच्या सभेत महिलांच्या व मुलींच्या सुविधांसाठी विविध विकासकामांना मंजुरी जयसिंगपूर : २ कोटींच्या निधीतून क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभशिरदवाड आणि शिवनाकवाडीच्या आरोग्य शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद; ६६२ नागरिकांची तपासणीकोयनेचे वीजनिर्मितीनंतरचे पाणी मुंबईला नेण्यास हरकत नाही; मात्र वारणेचे पाणी देणार नाही : हसन मुश्रीफलक्ष्मी वकिलांच्या झोळीत, शेतकरी-बहिणी मात्र वाऱ्यावर? सतेज पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल!समता, नामस्मरण आणि सेवेचा प्रकाश : गुरु नानक जयंतीकोल्हापूर जिल्ह्यात सलग १७ तास रिक्षा बंद; प्रवाशांची गैरसोय, विविध ठिकाणी निदर्शनेखेबवड्यातील वर्षानुवर्षे बंद असलेला हातपंप पुन्हा सुरू; सागर भोगम यांच्या पाठपुराव्याला यशयुवाशक्ती फाऊंडेशनच्या भव्य नोकरी मेळाव्यात ५०० युवकांना रोजगाराची सुवर्णसंधी; सागर भोगम यांच्याकडून आयोजकांचे कौतुकसहकाररत्न शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांना मान्यवरांकडून अभिवादन

जाहिरात

 

महिला व बाल कल्याण समितीच्या सभेत महिलांच्या व मुलींच्या सुविधांसाठी विविध विकासकामांना मंजुरी

schedule24 Nov 26 person by visibility 69 categoryमहानगरपालिका

  कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीची सभा महापालिकेतील छत्रपती ताराराणी सभागृहात समितीच्या सभापती सौ. कौसर इस्माईल बागवान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

  या सभेत शहरातील महिलांसाठी विविध ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहांची दुरुस्ती, तसेच महानगरपालिकेच्या विविध शाळांमधील मुलींच्या स्वच्छतागृहांची दुरुस्ती व शाळांची रंगरंगोटी करण्याच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या कामांना समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली.

  महिला व मुलींसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांचे आरोग्य व स्वच्छता राखणे आणि शैक्षणिक संस्थांमधील सोयी-सुविधांमध्ये सुधारणा करणे, या अनुषंगाने विविध कल्याणकारी उपक्रमांचाही आढावा घेण्यात आला. मंजूर कामे तातडीने हाती घेऊन ती दर्जेदार व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना सभापती सौ. कौसर बागवान यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

  सभेस अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपसभापती सौ. दिपा ठाणेकर, सहाय्यक आयुक्त उज्वला शिंदे, नगरसचिव दिवाकर कारंडे, समिती सदस्य सौ. निलिमा पाटील, सौ. प्राजक्ता जाधव, सौ. वंदना मोहिते, सौ. अरुणा गवळी, सौ. धनश्री कोरवी, सौ. अनुराधा मुळीक, सौ. जयश्री कांबळे व महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

  महिलांसाठी स्वच्छ व सुरक्षित सुविधा, मुलींसाठी आरोग्यदायी शालेय वातावरण आणि आवश्यक पायाभूत सोयी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने समितीने विविध विकासकामांना मंजुरी देत सकारात्मक निर्णय घेतले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes