शिरदवाड आणि शिवनाकवाडीच्या आरोग्य शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद; ६६२ नागरिकांची तपासणी
schedule24 Nov 26 person by visibility 125 categoryआरोग्य
शिरोळ : ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सहकारमहर्षी स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिरोळ तालुक्यात सुरू असलेल्या मोफत आरोग्य व नेत्र तपासणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिरदवाड आणि शिवनाकवाडी येथे आयोजित आरोग्य शिबिरांमध्ये एकूण ६६२ नागरिकांची आरोग्य व नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये २७४ नागरिकांची आरोग्य तपासणी, तर ३८८ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यामुळे या अभियानातील आजअखेर लाभार्थ्यांची संख्या १७ हजार ९४५ वर पोहोचली आहे.
आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन आणि शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, यड्राव यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच मोफत आरोग्य व नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध होत असल्याने या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शिरदवाड येथे झालेल्या शिबिरात १९४ नागरिकांची आरोग्य तपासणी, तर २२८ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. एकूण ४२२ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी महादेव भाऊसो कोळी, श्रीकांत आप्पा गतारे, अशोक नेमू मगदूम, भीमराव पांडुरंग कांबळे, महादेव दत्तात्रय पाटील, डॉ. बी. एन. मगदूम आणि प्रकाश तटमुठे उपस्थित होते.
शिवनाकवाडी येथे आयोजित शिबिरात ८० नागरिकांची आरोग्य तपासणी, तर १६० नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. एकूण २४० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी सतीश बरगाले, दगडू भिलवडे, भूपाल खोत, राजाराम खोत, श्रीकांत खोत, इर्शाद अत्तार, पी. जी. खोत, उत्तम काटकर, विजय खोत, दत्तात्रय आरगे आणि आशा खोत यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.