SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गांधीनगर पोलीस ठाणे हद्दीतील पंचगंगा नदीपुल येथे तलवारी घेऊन फिरणाऱ्या चौघांना अटक, दोघांचा शोध सुरूशिवाजी विद्यापीठात बिरसा मुंडा यांची १५० वी जयंतीपरिवर्तनवादी व्यक्तींचा इतिहास विसरू नका : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; अनुसूयाबाई काळे स्मृती सदना’चे मुखमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनकोल्हापुरात प्रशांत नाकवे यांचे उद्या रविवारी व्याख्यानगवळी, डिसोजा यांची कविता मानवी मूल्यांची बूज राखणारी: डॉ. माया पंडित; शिवाजी विद्यापीठात काळसेकर पुरस्कारांचे वितरणलोकशाहीर विठ्ठल उमप फौंडेशनतर्फे १५ वा 'मृदुगंध' पुरस्कार वितरण सोहळा २६ रोजी मुंबईत शिल्पकार राम सुतार यांच्या प्रतिभासंपन्न कला कर्तृत्वाचा गौरव – पालक मंत्री जयकुमार रावलसंजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात ‘कुष्ठरोग शोध अभियान’ अंतर्गत राज्यात १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान घरोघरी तपासणीडिझेल, पेट्रोल व पेट्रोलियम सदृश्य द्रव पदार्थाची अनधिकृत साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुध्द कडक कारवाई

जाहिरात

 

कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले, कारवर झाड कोसळले

schedule20 May 24 person by visibility 1021 categoryराज्य

कोल्हापूर : शहर परिसरात आज, सोमवारी दुपारच्या सुमारास  वादळी वाऱ्यासह वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान, जोतिबा रोडवर कारवर मोठे झाड कोसळले. या दुर्घटनेत दोघे जखमी झाले. तसेच कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

आगामी दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. सकाळपासूनच वातावरणात उष्मा असल्याने घामाच्या धारा वाहत होत्या. दरम्यान, दुपारी पावसाने वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. तर काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडाली. शहरात पाऊस झाल्यामुळे व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली .

दरम्यानच, जोतिबा देवाच्या दर्शनावरून येणाऱ्या भाविकांचा कारवर मोठे झाड कोसळले. यात दोघे भाविक जखमी झाले. याघटनेमुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes