SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पंचगंगा स्मशानभूमीत 'जादू ग्रुप'तर्फे शेणी दान उपक्रम हातमाग विणकरांसाठी 10 मार्च रोजी सोलापूर येथे हातमाग कापड स्पर्धेचे आयोजनअग्निवीर भरती २०२६ साठी १ एप्रिलपर्यंत ऑनलाइन नोंदणी सुरूसामाजिक न्याय विभागाच्या चित्ररथाला पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते हिरवी झेंडीलोकशाही दिनी १२२ तक्रार अर्ज दाखल; विहित मुदतीत निपटारा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशराजर्षी शाहू मिल येथे आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत गुरुवारी ५ मार्च रोजी मंत्रालयात बैठक : आमदार राजेश क्षीरसागरअथर्व शिंदे, तन्वी पाटील ठरले डी. वाय.पॉलिटेक्निकचे बेस्ट आउटगोइंग स्टुडंट्सस्वर्गीय विनायकराव क्षीरसागर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणादिनी महापालिका पंचगंगा स्मशानभूमीस १० हजार शेणी दानशिक्षण, राजकारण, समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक दुवा निखळला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ज्येष्ठ विचारवंत, माजी खासदार, माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांना श्रद्धांजलीहोलिका दहन: असत्यावर सत्याच्या विजयाचा जाज्वल्य उत्सव!

जाहिरात

 

महाराष्ट्र व पंजाब राज्यपालांच्या हस्ते आचार्य जवाहर लाल स्मृती मुद्रा व टपाल तिकिटाचे प्रकाशन

schedule16 Nov 25 person by visibility 309 categoryराज्य

देश पारतंत्र्यात असताना जैन आचार्य जवाहरलाल महाराजांकडून लोकांमध्ये पुनर्जागृतीचे कार्य :  राज्यपाल आचार्य देवव्रत

मुंबई : जैन संत व स्वातंत्र्य सेनानी आचार्य जवाहर लाल महाराज यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांमध्ये धर्म पुनर्जागृतीचे कार्य करीत असताना स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुद्रा तसेच टपाल तिकीट काढून त्यांच्या कार्याची माहिती भावी पिढ्यांना देण्याचे कार्य स्तुत्य आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र  व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज येथे केले.  

राज्यपाल  देवव्रत तसेच पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत आचार्य जवाहर लाल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांच्यावरील टपाल तिकिट व मुद्रेचे (नाण्याचे) प्रकाशन रविवारी (दि. १६) राजभवन मुंबई येथे करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत  बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन जसकरण बोथरा फाऊंडेशनतर्फे करण्यात आले.

भगवान महावीर तसेच विविध जैन संतांनी त्याग, तपस्या व परोपकाराच्या माध्यमातून समाजासाठी प्रेरणादायक काम केले. त्यांनी सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह हे सिद्धांत मानवतेला दिले. जो काळाच्या कसोटीवर टिकतो तो सच्चा धर्म व जो टिकत नाही तो अधर्म असतो असे राज्यपालांनी सांगितले. 

 आचार्य जवाहर लाल यांनी देश पारतंत्र्यात असताना दहा हजाराहून अधिक सत्संगाच्या माध्यमातून जनजागरणाचे कार्य केले. त्यांनी लोकांना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्रेरित केले. आचार्य जवाहर लाल यांनी अनेकांत वाद व अपरिग्रह ही तत्वे आयुष्यभर पाळली असे पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यावेळी म्हणाले. 

आचार्य जवाहर लाल महाराज यांनी बालविवाह, हुंडा प्रथा, व्यसनाधीनता यांना तीव्र विरोध केला याचे स्मरण देताना त्यांच्यावरील नाणे व टपाल तिकीट लोकांना त्यांच्या कार्याचे चिरंतन स्मरण देतील, असे श्री. कटारिया यांनी सांगितले.   

  यावेळी जसकरण फाउंडेशनचे विश्वस्त सिद्धांत बोथरा यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, पोस्ट मास्टर जनरल अमिताभ सिंह, जसकरण बोथरा फाउंडेशनचे विश्वस्त सिद्धार्थ बोथरा व इतर मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes