SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पंचगंगा स्मशानभूमीत 'जादू ग्रुप'तर्फे शेणी दान उपक्रम हातमाग विणकरांसाठी 10 मार्च रोजी सोलापूर येथे हातमाग कापड स्पर्धेचे आयोजनअग्निवीर भरती २०२६ साठी १ एप्रिलपर्यंत ऑनलाइन नोंदणी सुरूसामाजिक न्याय विभागाच्या चित्ररथाला पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते हिरवी झेंडीलोकशाही दिनी १२२ तक्रार अर्ज दाखल; विहित मुदतीत निपटारा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशराजर्षी शाहू मिल येथे आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत गुरुवारी ५ मार्च रोजी मंत्रालयात बैठक : आमदार राजेश क्षीरसागरअथर्व शिंदे, तन्वी पाटील ठरले डी. वाय.पॉलिटेक्निकचे बेस्ट आउटगोइंग स्टुडंट्सस्वर्गीय विनायकराव क्षीरसागर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणादिनी महापालिका पंचगंगा स्मशानभूमीस १० हजार शेणी दानशिक्षण, राजकारण, समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक दुवा निखळला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ज्येष्ठ विचारवंत, माजी खासदार, माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांना श्रद्धांजलीहोलिका दहन: असत्यावर सत्याच्या विजयाचा जाज्वल्य उत्सव!

जाहिरात

 

पंचगंगा स्मशानभूमीत 'जादू ग्रुप'तर्फे शेणी दान उपक्रम

schedule02 Mar 26 person by visibility 3 categoryसामाजिक

कोल्हापूर : सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देत, येथील 'जादू ग्रुप'च्या वतीने पंचगंगा स्मशानभूमी येथे 'शेणी दान' उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाद्वारे स्मशानभूमीतील इंधनाची गरज पूर्ण करण्यासाठी ग्रुपच्या वतीने मोलाचे योगदान देण्यात आले.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे 'जादू ग्रुप'चे लहानांपासून थोरांपर्यंत सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक कार्याची आवड आणि निस्वार्थ सेवेची भावना उराशी बाळगून सर्व सदस्यांनी या श्रमदानात आणि शेणी दान उपक्रमात सहभाग नोंदवला.

स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी लाकडांसोबतच शेणींचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. इंधनाची ही गरज ओळखून जादू ग्रुपने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला. यावेळी बोलताना ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले की, "समाजाप्रती आपले काही देणे लागते, याच भावनेतून आम्ही वेळोवेळी अशा उपक्रमांचे आयोजन करत असतो. आजच्या उपक्रमात बाल सदस्यांच्या सहभागामुळे त्यांनाही सामाजिक कार्याची गोडी लागेल." 'जादू ग्रुप'च्या या पुढाकारामुळे सामाजिक कार्याचा एक नवा आदर्श समोर आला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes