SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विधी शिक्षणातील कौशल्यांचा उपयोग समाजहितासाठी व्हावा : कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्केकोरे डिप्लोमा विद्यार्थ्याची आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड; ६ लाखांचे वार्षिक पॅकेजजिल्हाधिकारी कार्यालय चौक ते आदित्य कॉर्नर या परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाईव्यवसाय परवाना न घेतल्याने राजारामपुरीतील मेहता पब्लिशिंग हाऊसचे दुकान सीलबंदठरावधारकांवर विश्वास नसल्यानेच शपथा घ्यायला लावण्याची महायुतीच्या नेत्यांवर नामुष्की : सतीशचंद्र कांबळे मॉडेल युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रतिनिधित्वाची संधीकोंडीग्रे येथील आरोग्य शिबिरात ४२२ नागरिकांची तपासणीपदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याने पूर्ण ताकदीने मैदानात उतरावे : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणगोकुळ निवडणुकीत मंत्र्यांच्या मुलाविरोधात सर्वसामान्य शेतकरीपुत्र मैदानात; शशिकांत खोतांचा जोरदार हुंकार!शिक्षकांच्या अन्यायाविरोधात रोष! पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर ‘एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेने’चा बहिष्कार

जाहिरात

 

जिल्हाधिकारी कार्यालय चौक ते आदित्य कॉर्नर या परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई

schedule13 Oct 26 person by visibility 148 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक 4 छत्रपती ताराराणी मार्केट उपद्रव शोध पथक आणि अतिक्रमण निर्मूलन पथकाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय चौक ते आदित्य कॉर्नर या परिसरातील फुटपाथवरील अनधिकृत फळविक्रेत्यांवर आज कारवाई करण्यात आली. 

या कारवाईदरम्यान 1 हातगाडी, 50 कॅरेट, 8 फळांच्या थाळया व इतर साहित्य जप्त करण्यात आले. अनधिकृत व्यवसाय आणि अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली असून पुढील काळातही कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे. अनधिकृत व्यवसाय व अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी जप्त करण्यात आलेले साहित्य संबंधित व्यवसायधारकांना परत दिले जाणार नसून ते कायमस्वरूपी जप्त करण्यात आले आहे.
महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. उपआयुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत सहायक आयुक्त डॉ.विजय पाटील, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत, मुकादम दुषम पाटील, विभागीय कार्यालय क्रमांक 4 व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तसेच उपद्रव शोध पथकाकडील जवान सहभागी झाले होते.  

▪️अतिक्रमणधारकांना महापालिकेचा इशारा
शहरातील अनधिकृत फेरीवाले, व्यावसायिक, रस्त्यांवर उभारण्यात आलेले अनधिकृत शेड्स आणि इतर अतिक्रमणांविरोधातील कारवाई यापुढे अधिक तीव्र करण्यात येणार आहे. संबंधितांनी आपापली अतिक्रमणे तातडीने स्वतःहून हटवावीत. अन्यथा कारवाई करून जप्त केलेले साहित्य परत दिले जाणार नाही, असा इशारा कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes