SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विधी शिक्षणातील कौशल्यांचा उपयोग समाजहितासाठी व्हावा : कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्केकोरे डिप्लोमा विद्यार्थ्याची आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड; ६ लाखांचे वार्षिक पॅकेजजिल्हाधिकारी कार्यालय चौक ते आदित्य कॉर्नर या परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाईव्यवसाय परवाना न घेतल्याने राजारामपुरीतील मेहता पब्लिशिंग हाऊसचे दुकान सीलबंदठरावधारकांवर विश्वास नसल्यानेच शपथा घ्यायला लावण्याची महायुतीच्या नेत्यांवर नामुष्की : सतीशचंद्र कांबळे मॉडेल युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रतिनिधित्वाची संधीकोंडीग्रे येथील आरोग्य शिबिरात ४२२ नागरिकांची तपासणीपदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याने पूर्ण ताकदीने मैदानात उतरावे : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणगोकुळ निवडणुकीत मंत्र्यांच्या मुलाविरोधात सर्वसामान्य शेतकरीपुत्र मैदानात; शशिकांत खोतांचा जोरदार हुंकार!शिक्षकांच्या अन्यायाविरोधात रोष! पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर ‘एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेने’चा बहिष्कार

जाहिरात

 

विधी शिक्षणातील कौशल्यांचा उपयोग समाजहितासाठी व्हावा : कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के

schedule13 Oct 26 person by visibility 143 categoryशैक्षणिक

वारणानगर : विधी शिक्षणातून प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा उपयोग विद्यार्थ्यांनी समाजातील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी करावा, असे आवाहन वारणा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले.

वारणा विद्यापीठाच्या वारणा स्कूल ऑफ लॉच्या वतीने आयोजित इंडक्शन प्रोग्राममध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षा आणि गुणांपुरते मर्यादित न राहता, डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आपली व्यावसायिक कौशल्ये विकसित करावीत, असे त्यांनी सांगितले.

विधी शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी कायद्यांमधील सुधारणा, गाजलेले न्यायालयीन खटले (Celebrity Cases) आणि न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) यांचा अभ्यास करावा. तसेच, लीगल क्लिनिक सेंटर आणि मूट कोर्टच्या माध्यमातून स्थानिक समस्यांचा कायदेशीर दृष्टिकोनातून अभ्यास करून त्यावर उपाय शोधावेत, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. भालचंद्र मोटे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. सुरेखा यादव यांनी करून दिली. प्रा. तिवारी यांनी आभार मानले, तर किरण गुजर आणि श्रूती गोलगिरे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी, कुलसचिव, डॉ. आर. बी. पाटील, समन्वयक, डॉ. आर. बी. बसनाईक व प्राध्यापक उपस्थित होते 

या उपक्रमास श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, डॉ. विनय कोरे,वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी, एन. एच. पाटील आणि श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजिन्नी यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes