SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य सप्ताहाचे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठापावनखिंडच्या पाऊलखुणांवर ५०० हून अधिक शिवभक्तांची प्रेरणादायी पदभ्रमंतीज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थदर्शनाचे स्वप्न पूर्ण: नागपूरहून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रे’चा शुभारंभमहिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती: राज्यपाल जिष्णु देव वर्माकोल्हापूर पोलिसांचा गुन्हेगारांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’! रेकॉर्डवरील १६० सराईतांची उचलबांगडीलोकसंख्या नियंत्रणाचा संदेश: कसबा बावड्यात विद्यार्थ्यांचे पथनाट्य; नागरिकांमध्ये जनजागृतीविवाहात आहेर नको, थेट अंधशाळेला मदत! वाझे परिवाराचा कोल्हापुरात कौतुकास्पद उपक्रमशाश्वत जीवनशैलीचा स्वीकार हाच हवामान बदलावर प्रभावी उपाय’ : प्रा. चेतनसिंह सोलंकीशेंडा पार्क येथे सुरू असलेल्या विविध बांधकामाचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट करणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर अतिरीक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांची पूरग्रस्त भागांची पाहणी : यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना

schedule05 Jul 26 person by visibility 258 categoryमहानगरपालिका

  कोल्हापूर : मागील चार दिवसांपासून कोल्हापूर शहर व जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. संभाव्य पूरस्थिती व नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शहरातील शहरातील पूरग्रस्त भागांमध्ये पावसाचे पाणी साचून कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी आज विविध ठिकाणांची पाहणी केली.

 

  यावेळी राजाराम बंधारा, बाबुभाई परिख पूल, राजारामपुरी आठवी गल्ली आदी सखल भागांची पाहणी करून संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तत्काळ राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

 

  राजारामपुरी व इतर भागांमध्ये मागील चार दिवसात पडलेल्या झाडांची पाहणी करणेत आली. पुढील चार दिवसात शहरातील धोकादायक झाडे काढून घेणे संदर्भात सूचना यावेळी दिल्या.

 

  तसेच सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून नियमित टेहळणी करावी, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने आवश्यक कार्यवाही करून वरिष्ठांना अवगत करावे असे आदेश अतिरीक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी दिले.

या पाहणीवेळी सहाय्यक आयुक्त डॉ. विजय पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे तसेच महापालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes