SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे : कादंबरीकार मेधा देशमुख भास्करनआरोग्य सेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर शिक्षकांसाठी 'आरोग्य कवच' योजना राबवणार : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरभरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठितकोल्हापुरात दहीहंडी उत्सवाचा अभूतपूर्व थरारज्ञानाचा खरा ठेवा: राष्ट्रीय पुस्तक वाचन दिनडीवायपी इंजिनिअरिंग साळोखेनगरच्या गणेश राठोड, रोहीत बारवाडे यांना पीएचडी डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये 'मायक्रोसॉफ्ट'कडून ‘कॅम्पस टू कॉर्पोरेट’ची यशस्वी चर्चा कोल्हापूर : मुख्य रस्त्यांवरील खराब चेंबर दुरुस्तीला गतीएमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण अनुसूचित जातीच्या उमेदवारांना ‘बार्टी’कडून १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य

जाहिरात

 

शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे : कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन

schedule06 Sep 26 person by visibility 180 categoryराज्य

कोल्हापूर :  आदिलशाही आणि मुघल साम्राज्याशी लढा देणारे शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे होते, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिध्द कादंबरीकार श्रीमती मेधा देशमुख भास्करन (बेंगलोर) यांनी  केले.

शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्रामार्फत गणित अधिविभागामधील रामानुजन सभागृहामध्ये 'आर्ट अँड लिटरेचर क्लब अंतर्गत' प्रसिध्द इंग्रजी कादंबरीकार श्रीमती मेधा देशमुख भास्करन (बेंगलोर) यांची मुलाखत तसेच संशोधक विद्यार्थ्यांशी संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  त्याप्रसंगी कादंबरीकार देशमुख भास्करन बोलत होत्या.  लेखिका प्रमिला जरग, मित्रा देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

देशमुख भास्करन मुलाखतीमध्ये  म्हणाल्या, कादंबरीचे लेखन करताना अत्यंत उच्च दर्जाचे शब्द वापरून लोकांना शब्दकोश पाहण्यास भाग पाडले जावू नये. कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती साध्य करण्यासाठी भाषा अडथळा ठरू शकत नाही. संयम असेल तर कोणतीही भाषा आत्मसात करता येते. नेपोलियन बोनापार्टवर एक लाखाहून अधिक पुस्तके इंग्रजीमधून लिहिलेली आहेत.  तसेच, जागतिक पातळीवरील अनेक योद्धे, महायोद्‌ध्यांवर इतिहासकारांनी हजारो पुस्तके इंग्रजीमध्ये लिहिली आहेत.  परंतू, जागतिक स्तरावर शिवरायांवर एकही पुस्तक इंग्रजीमध्ये उपलब्ध नव्हते.  यातूनच, छत्रपती शिवाजी महाराजांवर इंग्रजीमधून लेखन करण्याची प्रेरणा मिळाली.  वैश्विक पातळीवर शिवरायांचे कर्तृत्व योग्य प्रकारे पोहोचावे यासाठी इंग्रजी भाषेतून बायो-फिक्शन आणि चरित्रात्मक लेखन केले.  शिवरायांवर पुस्तक लिहिण्यापूर्वी सुमारे 10 वर्षे 50 पेक्षा जास्त एेतिहासिक ग्रंथांचा आणि कागदपत्रांचा सखोल अभ्यास केला. शिवराय विरूध्द औरंगजेब हा केवळ राजकीय संघर्ष नव्हता तर एका आक्रमाकाविरूध्द स्वत:च्या मातीचे आणि लोकांचे रक्षण करण्यासाठी उभारलेले स्वराज्य होते.  

ज्येष्ठ इतिहासकार डॉ.जयसिंगराव पवार लिखित 'चिकित्सा' या पुस्तकाच्या प्रेरणेतून 'लाईफ अँड डेथ ऑफ संभाजी' या पुस्तकासाठीची प्रेरणा मिळाली. अत्यंत विपरीत परिस्थितीत स्वराज्याचे रक्षण करताना संभाजी राजेंंनी दाखवलेली निष्ठा ही भारतीय इतिहासातील अतुलनीय शौर्यगाथा आहे.

शाहू संशोधन केंद्राच्या संचालिका डॉ.मंजुश्री पवार आणि इतिहास अधिविभागप्रमुख डॉ.अवनीश पाटील यांनी मुलाखत घेतली. सूत्रसंचालन अभय गायकवाड यांनी केले तर डॉ.देविकाराणी पाटील यांनी आभार व्यक्त केले.  कार्यक्रमानंतर कादंबरीकार मेधा भास्करन यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देवून एेतिहासिक घटनांचे लेखन करताना घटना कोणत्या परिस्थितीत आणि कशा प्रकारे मांडली गेली हे कसे पाहावे लागते याचे वर्णन केले.

याप्रसंगी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.रघुनाथ धमकले, डॉ.रणधीर शिंदे, डॉ.नंदकुमार मोरे, डॉ.अरूंधती पवार, अनिता पवार यांचेसह इतिहास प्रेमी जनता, विविध अधिविभागातील संशोधक विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठयाप्रमाणात उपस्थित होते.

 

                                                                                                              -----

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes