SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक: कोल्हापूर जिल्ह्यात चुरशीने मतदान; उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंदपरीक्षा अर्जासाठी ‘झिरो चलन’ सुविधा उपलब्ध : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटीलसिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचे राज्यपालांना निमंत्रणघरफाळा थकबाकीदारांवर कोल्हापूर महापालिकेची कारवाई; दोन गाळे सील, पाच मिळकतींचे पाणी कनेक्शन खंडितशहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने 62 थकबाकीदार कनेक्शन धारकांवर कारवाईगोकुळच्या साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त न्याय मिळू दे; सतेज पाटील यांचे गाेकुळ संचालकांना घेऊन हालसिद्धनाथाला साकडेकोल्हापुरातील सायबर महाविद्यालयात २७ व २८ ऑक्टोबर रोजी ‘किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’शालेय पोषण आहारात 'केंद्रीय किचन पद्धती'ला तीव्र विरोध; कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २६ ऑक्टोबरला निदर्शनेभुदरगड महसूल लोक अदालतीत २२ प्रकरणांमध्ये तडजोड; १७६ खातेदारांना लाभनवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत रविवारी नवसाक्षरांची परीक्षा

जाहिरात

 

डीवायपी इंजिनिअरिंग साळोखेनगरच्या गणेश राठोड, रोहीत बारवाडे यांना पीएचडी

schedule05 Sep 26 person by visibility 486 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : साळोखेनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचे सहाय्यक प्राध्यापक गणेश ईश्वर राठोड आणि रोहीत शांतिनाथ बारवाडे यांना मध्यप्रदेशमधील  मानसरोवर ग्लोबल विद्यापीठ, भोपाळकडून पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली. 

गणेश राठोड यांनी ‘सायबर सिक्युरिटी आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज’ या क्षेत्रात संशोधन केले आहे. त्यांनी इंटरनेट ऑफ थिंग्ज नेटवर्कमधील घुसखोरी ओळखण्यासाठी ऑप्टिमायझेशन-सक्षम हायब्रिड डीप लर्निंग मॉडेल विकसित केले. तर रोहीत बारवाडे यांनी हेल्थकेअर आणि इंटरनेट ऑफ मेडीकल थिंग्ज या क्षेत्रात संशोधन केले आहे. त्यांनी तीव्र लिम्फोसाइटिक ल्युकेमिया आणि तीव्र मायलॉइड ल्युकेमिया या रक्ताच्या कर्करोगाच्या प्रकारांचे स्वयंचलित निदान करण्यासाठी डीप लर्निंग मॉडेल विकसित केला आहे. या संशोधनामुळे रक्ताच्या कर्करोगाचे लवकर निदान होण्यास मदत होऊ शकते. 

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील, कॅम्पस डारेक्टर डॉ. अभिजीत माने, प्राचार्य डॉ. सुरेश माने, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील यांनी डॉ. राठोड व डॉ. बारवाडे यांचे अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes