SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डिझेल, पेट्रोल व पेट्रोलियम सदृश्य द्रव पदार्थाची अनधिकृत साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुध्द कडक कारवाईपदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या प्रारूप व अंतिम मतदार याद्यांच्या प्रसिद्धीच्या तारखेत बदलबरेली येथे 8 ते 16 डिसेंबर रोजी अग्निवीर भरतीसार्वजनिक ठिकाणी तंबाखू विरोधी कारवाया वाढवाव्यात; राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देशबिहार विधानसभा निकालाबद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने आनंदोत्सव महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी 'एआय' प्रशिक्षण कार्यशाळा घेणारऊसतोड कामगारांसाठीच्या सुविधांबाबत पथकांद्वारे तपासणी; चांगल्या सुविधा पुरविण्याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देशग्रामीण महिलांना सक्षमीकरणाच्या संधी प्रदान करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील: प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधवशिवाजी विद्यापीठात पंडित नेहरू जयंतीसहकार सप्‍ताह निमित्‍त गोकुळमध्‍ये ध्‍वजारोहण

जाहिरात

 

जीतो कोल्हापूर चॅप्टरतर्फे अहिंसा - शांतता प्रसारार्थ 'अहिंसा रन रॅली ' उत्साहात; जय जिनेंद्रचा जल्लोष

schedule31 Mar 24 person by visibility 526 categoryसामाजिक

कोल्हापूर: जितो - कोल्हापूर चॅप्टर अर्थात जैन इंटर नॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन सामाजिक मुल्य वर्धन स्तरावर कार्य करत असलेल्या संघटनेच्या वतीने ३१ मार्च रोजी 'अहिंसा रन रॅली" ही मॅरेथॉन स्पर्धा उत्साही वातावरण आणि जय जिनेन्द्र च्या जल्लोषात पार पडली . रविवारी पहाटे पोलीस ग्राऊंडवर पहाटे सहा वाजता जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या सह कोल्हापूर चॅप्टर चेअरमन गिरीष शहा, अनिल पाटील रमणलाल संघवी , जितेंद्र राठोड आणि जिल्हा कार्यकारिणीने केले आहे.

प्रांरभी सर्वाचे स्वागत करताना गिरीष शहा यांनी 'मनात असलेले अहंकार, राग, मत्सर, स्वार्थ असे दूषित विचारामुळे सर्वत्र हिंसाचार घडत आहेत. प्रत्येकाच्या मनातील दुषित विचारावर मात करण्यासाठी प्रेम, दया, क्षमा, शांती संदेश महत्वपूर्ण ठरतो. जगा व जगू दया या उपदेशा मधून अहिंसा आणि शांतता प्रस्थापित होत आहे. आज या विचारांचा प्रसार होणेची मोठी गरज आहे. जगभर शांतता नांदावी व अहिंसेचा प्रसार व्हावा या उद्देशाने जीतो संघटनेचे जगातील २६ देशात आणि भारतात विविध शहरात ८० चॅप्टर वतीने अहिंसा रॅलीचे आयोजन केले आहे. यामध्ये ३-५ आणि १० किलोमीटर अशा तीन गटात ही रॅली संपन्न होत असल्याचे सांगितले. जिल्हा पोलीस प्रमुख पंडित यांनी अवघ्या जगाला मार्गदर्शक असणारे अहिंसा आणि प्रेमाचे विचार हे या रॅलीतून व्यक्त होत असून त्यामुळे समाजातील सकारात्मकता वाढीस लागेल अशा शब्दात आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. 

प्रमुख पाहुण्यांनी झेंडा दाखवल्यानंतर पोलीस परेड ग्राउंड पासून धैर्यशील प्रसाद मंगल कार्यालय शिवार विद्यालय कसबा बावडा आणि परतीच्या मार्गावर या स्पर्धा तीन गटात संपन्न झाल्या या स्पर्धेतील विविध गटातील विजेते गिरी ऋषिकेश शिरूरकर, यश कांबळे, राहुल साळुंखे, सुरज विचारे, मीना देसाई, यांच्यासह इतर सहभागी खेळाडूंना तसेच प्रायोजक संजय घोडावत समूह व इतरांनामान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह - प्रमाणपत्र - मेडल देण्यात आले . 

 या स्पर्धेच्या संयोजनासाठी चेअरमन गिरीष शहा ' रोम कनव्हेनर जितेंद्र राठोड , उपाध्यक्ष रवी संघवी ,मुख्य सचिव अनिल पाटील, खजानीस रमणलाल संघवी , सदस्य शितल गांधी ,महिला आघाडीच्या अधक्षा श्रेया गांधी, सचिव माया राठोड , सह सचिव स्विटी पोरवाल - पूजा काले ,युवा आघाडीचे अध्यक्ष चिंतन राठोड , सचिव चिन्मय कर्णावट, सह जयेश ओसवाल 125 हून अधिक जीतो कोल्हापूर चाप्टर कार्यकर्ते कार्यरत होतेया टीमच्या कुशल नियोजनामुळे स्पर्धेच्या नियोजनापासून ते स्पर्धा संपन्न होईपर्यंत सर्व यंत्रणा आंतरराष्ट्रीय दर्जाप्रमाणे राबवली गेली सर्व सहभागी खेळाडूंना सहभागी प्रमाणपत्र टी-शर्ट यास ह अल्पोपहार व्यवस्था अत्यंत विनयशीलतेने देण्यात आली होती . अप्पल हॉस्पिटल ज्या व्यक्तीने यावेळी रुग्णवाहिक वैद्यकीय सेवा ही पुरवण्यात आलीतर कोल्हापूर पोलीस दल आणि टीम रोहन व्हिडिओ यांचे यासाठी सहकार्य लाभले .

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes