कोल्हापूरमध्ये वंध्यत्वासंदर्भातील सर्वांगीण शास्त्रीय परिषद संपन्न; महाराष्ट्र शाखा ISAR (MSR), KOGS चा संयुक्त उपक्रम
schedule13 Jul 25 person by visibility 221 categoryआरोग्य

▪️जननदर वाढविण्यासाठी डॉक्टर संघटना आणि शिवाजी विद्यापीठ एकत्र येऊन उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील राहू या; कुलगुरू डॉ. डी. टी .शिर्के यांचे प्रतिपादन
कोल्हापूर : जननदर कमी होणे ही समस्या वाढत चालली आहे. या समस्येवर उपाययोजना करणे आवश्यक आहे यासाठी शासन, डॉक्टर आणि युनिव्हर्सिटी यांनी एकत्रित येऊन उपायोजना करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केले. वंध्यत्व विषयक दोन दिवसीय शास्त्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठ कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के शिवाजी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी कुलगुरू बोलत होते.
वंध्यत्व हा एक गंभीर आणि वाढता आरोग्यविषयक प्रश्न असून, यावर योग्य निदान व उपचाराची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ISAR (इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रॉडक्शन) – महाराष्ट्र राज्य शाखा यांच्या अध्यक्षतेखाली आणि कोल्हापूर ऑब्स्टेट्रिक्स अॅण्ड गायनेकॉलॉजी सोसायटी (KOGS) यांच्या सहभागाने १२ व १३ जुलै २०२५ रोजी ही परिषद हॉटेल सयाजी येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर किरण कुर्तकोटी उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठ आणि डॉक्टर यांच्या समन्वयाने जननदरवर मार्ग काढता येईल का यावर अभ्यासपूर्ण एकत्र येऊन चर्चा करून उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील राहूया असे मत कुलगुरूंनी व्यक्त केले. शिवाय भविष्यात जनन दर समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहे.यासाठी शासन,विद्यापीठ आणि डॉक्टर यांनी पुढाकार घेऊन उपाययोजना करूया असे मत व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर डॉ. रणजीत किल्लेदार, डॉ.चैतन्य शेंबेकर, डॉ. अमित पतकी,डॉ. केदार गणला,डॉ. एम.जे नागावकर, डॉ. तानाजी पाटील आदी उपस्थित होते.
आज दिवसभरात झालेल्या स्त्री व पुरुष वंध्यत्व, हार्मोनल असंतुलन, आधुनिक उपचारपद्धती (IVF, IUI), जनुकीय चाचण्या, आणि नवीनतम तंत्रज्ञान यांसारख्या वंध्यत्वाच्या सर्व पैलूंवर सखोल चर्चा झाली. शिवाय नवीन वैज्ञानिक उपचार पद्धती,कमीत कमी औषधाचा उपयोग करून करण्यात येत असलेली उपचार पद्धती,राज्यभरातील आणि देशपातळीवरील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ, Embryologist युरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आणि या क्षेत्रातील अग्रणी संशोधक यांनी परिषदेत मार्गदर्शन केले. यावेळी झालेल्या चर्चासदांमधून चर्चासत्रामध्ये टेस्ट ट्यूब बेबी यासारख्या आधुनिक आणि उपचार पद्धती त्यातील नवीन झालेले संशोधन याचे सादरीकरण झाले. यामध्ये एमरँलॉजी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले शिवाय नवोदित तरुण डॉक्टरांनी त्यांनी अभ्यासपूर्ण तयार केलेले लेख याचे सादरीकरण केले जयदीप टांक यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात डॉ. नंदिता पालशेतकर, डॉ . नलिनी महाजन,डॉ. अमित पतकी, डॉ. केदार गणला सचिव, एमएसआर, आणि डॉ. तानाजी पाटील सहआयोजक सचिव, केओजीएस, तसेच डॉ. रणजित किल्लेदार सचिव, केओजीएस , डॉ. साधना पटवर्धन, डॉ. चैतन्य शेंबेकर, डॉ. सतीश पत्की, डॉ. मिलिंद पिशवीकर, आणि डॉ. प्रविण हेन्द्रे हे सर्व या परिषदेमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी वैद्यकीय उपचार पद्धती वर मार्गदर्शन केले.
नवोदित डॉक्टर व वैद्यकीय व्यावसायिकांसाठी ही परिषद एक मौल्यवान शैक्षणिक संधी ठरणार आहे असे महाराष्ट्र ISAR शाखेच्या अध्यक्षा डॉ. पद्मारेखा जिरगे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले. महाराष्ट्र ISAR शाखेची अध्यक्ष पदाची सूत्रे ही डॉ.अमित पतकी यांना सोपविण्यात आली.
“ही परिषद कोल्हापूरमध्ये घेण्यासाठी डॉ .पद्मरेखा जिरगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.आणि या परिषदेमुळे कोल्हापूरमधील स्त्रीरोगतज्ज्ञांना जागतिक दर्जाचे ज्ञान आणि तंत्रज्ञान समजून घेण्याची संधी मिळाली आहे.या परिषदेत KOGS चा सक्रिय सहभाग असून, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व स्त्रीरोगतज्ज्ञांमध्ये या विषयाबाबत एकसंध जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
ही परिषद कोल्हापूर येथील हॉटेल सयाजीमध्ये होत आहे. आज 13 जुलै रोजी ही या परिषदेत डॉक्टरांना मार्गदर्शन मिळणार आहे. सूत्रसंचलन डॉ.रोहन पालशेकर आणि डॉ.गरिमा चौधरी यांनी केले.