SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूरी गुळ जगभरात पोहोचण्यासाठी जीआय नोंदणी करा : डॉ. सुभाष घुलेकोल्हापूर येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा आढावा; राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचनाडॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला 'व्हेरी गुड' श्रेणीडी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार : डॉ. संजय डी. पाटील; विद्यापीठाचा पाचवा स्थापना दिवस उत्साहात साजराडी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे ''राष्ट्रीय डॉक्टर डे' उत्साहात; कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याकडून शुभेच्छाशक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारु नका : सतेज पाटील विधानपरिषदेत कडाडले जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारी 7 जुलै रोजीविमा योजनेतील भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कधी कारवाई करणार ; सतेज पाटील यांचा सवाल : महिन्याच्या आत कारवाईचे कृषीमंत्र्यांचे आश्वासनशिवाजी विद्यापीठात वसंतराव नाईक जयंती उत्साहातहज यात्रेकरू कोल्हापुरात दाखल !! हज फाऊंडेशन आणि लिम्रास ट्रस्टच्यावतीने जोरदार स्वागत

जाहिरात

 

फक्त बाल रसिकांचेच नाही तर पालकांच्या आणि नातेवाईकांच्याही पसंतीस उतरणार "अंजू उडाली भुर्रर्रर्र"

schedule18 Mar 25 person by visibility 378 categoryमनोरंजन

▪️ प्रेरणा थिएटर्सचे भव्य दिव्य धमाल बालनाट्य "अंजू उडाली भुर्रर्रर्र" लवकरच रंगभूमीवर

  मुंबई : प्रेरणा थिएटर्सचे भव्य दिव्य धमाल बालनाट्य "अंजू उडाली भुर्रर्रर्र" लवकरच बाल रसिकांचेच नाही तर पालकांचे आणि नातेवाईकांचेही मनोरंजन करण्यासाठी रंगभूमीवर दाखल होत आहे. १९ एप्रिल रोजी डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे शुभारंभाचा प्रयोग होणार असून त्यानंतर मुंबई, पुणे, नाशिक आणि संपूर्ण महाराष्ट्रभर हे बालनाट्य रसिकांचे मनोरंजन करत फिरणार आहे. 

अशोक पावसकर आणि सौ.चित्रा पावसकर हे गेली पन्नासहून अधिक वर्षे निस्वार्थीपणे बाल रंगभूमीची सेवा करणारे दाम्पत्य. ह्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कलाकार तयार झाले. नावारूपाला आले. पावसकर दांपत्य डॉक्टर सलील सावंत या तरुण निर्मात्याच्या साथीने अंजू उडाली भुर्र हे एक भव्य दिव्य बाल नाट्य प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. गुरुवर्य नरेंद्र बल्लाळ लिखित हे नाटक ५५ वर्षांपूर्वी रंगभूमीवर सादर झालं होतं. त्यावेळी आताच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री ईला भाटे यांनी अंजुची भूमिका केली होती. तसेच आताचे सुप्रसिद्ध अभिनेते दिगंबर राणे आणि स्वतः पावसकर दांपत्य या नाटकात अभिनय करत असत. प्रेरणा थिएटरस निर्मित हे नाटक म्हणजेच १९ एप्रिल रोजी रंगमंचावर येणार आहे आणि गुरुवारी नरेंद्र बल्लाळ ह्यांची जयंती आणि ठाणे वैभव ह्या वर्तमानपत्राचा सुवर्णमहोत्सव हा योग साधून १९ एप्रिल रोजी डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे शुभारंभाचा प्रयोग होणार असून त्यानंतर मुंबई, पुणे, नाशिक आणि संपूर्ण महाराष्ट्रभर हे बालनाट्य रसिकांचे मनोरंजन करत फिरणार आहे. आता ह्या नाटकाचे पुनर्लेखन, गीत लेखन आणि दिग्दर्शन कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक, ती फुलराणी, हिमालयाची सावली, करून गेलो गाव आणि इतर अनेक नाटकांचे लेखक दिग्दर्शक राजेश देशपांडे करणार आहेत. नेपथ्य अलबत्या गलबत्या ह्या गाजत असलेल्या नाटकाचे आणि इतर अनेक नाटकांचे नेपथ्य करणारे संदेश बेंद्रे करत आहेत. प्रकाश योजना सुप्रसिद्ध प्रकाशयोजनकार श्याम चव्हाण तर संगीत हवा येऊ दे मध्ये आपल्या संगीताने विनोदी पंचेसना फुलवणारे तुषार देवल याचं आहे. रंगभूषा उदयराज तांगडी आणि वेशभूषा श्रद्धा माळवदे आणि पूजा देशमुख करत आहेत. ध्वनी संयोजन सुनील नार्वेकर करणार आहेत. जाहिरात संकल्पना आणि डिझाइन अक्षर शेडगे ह्यांचे आहे. जाहिरात प्रसिद्धी बी.वाय.पाध्ये पब्लिसिटी ही अनेक वर्षांपासूनची विश्वासार्ह जाहिरात एजन्सी करत असून नाटकाचे सूत्रधार नितीन नाईक आहेत. 

 यात ९ हरहुन्नरी कलाकार असून त्यात हवा येऊ दे फेम अंकुर वाढवे, यदाकदाचित मधील धमाल गांधारी पूर्णिमा अहिरे, सृजन द क्रियेशनच्या कार्यशाळेतून तयार झालेले गुलाब लाड, चिंतन लांबे, विजय मिरगे, प्राची रिंगे, गौरवी भोसले, प्राधीर काजरोळकर आणि अंजूच्या भूमिकेत नवोदित बाल अभिनेत्री स्कंदा गांधी दिसणार आहेत. संगीत नृत्य आणि चमत्कारपूर्ण नेपथ्य प्रकाश योजनेने सजलेले हे बाल नाट्य फक्त बाल प्रेक्षकांच्याच नाही तर त्यांच्या पालकांच्या आणि नातेवाईकांच्या पण पसंतीस उतरेल असा विश्वास या सगळ्या चमूला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes