SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठात एनर्जी स्वराज यात्रेचे स्वागतमोडी लिपी अभ्यासक्रमास प्रवेशासाठी 20 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढरब्बी हंगाम 2024 पीकस्पर्धा निकाल जाहीरकोल्हापुरात अतिक्रमणावर कारवाईसर्वेश पोतदार बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्ययेणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; श्रीयश आयुर्वेदिक कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल रिसर्च सेंटर नूतन वास्तू उद्घाटनमहाराष्ट्र व पंजाब राज्यपालांच्या हस्ते आचार्य जवाहर लाल स्मृती मुद्रा व टपाल तिकिटाचे प्रकाशनमाजी मुख्यमंत्री दिवगंत वसंतराव नाईक यांचे कार्य राज्याला दिशादर्शक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसस्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हॉटेल असोसिएशनसोबत कार्यशाळाकोल्हापूर महापालिकेच्यावतीने उघड्यावर कचरा टाकणाऱ्यां व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई

जाहिरात

 

परदेश शिष्यवृत्तीसाठी 24 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेत

schedule16 Oct 25 person by visibility 188 categoryराज्य

कोल्हापूर : सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून केंद्र सरकार पुरस्कृत National Overseas Scholarship for SC etc. Candidates या परदेश शिष्यवृत्ती योजनेसाठी सन 2025-26 या वर्षाकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.nosmsje.gov.in या संकेतस्थळावरुन 24 ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी केले.

ही योजना भारत सरकारची असून अनुसूचित जाती, भटक्या व अर्धभटक्या जमाती, भूमिहीन शेतीमजूर आणि पारंपरिक कारागीर या घटकांतील अल्पउत्पन्न विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येते. या योजनेमुळे पात्र विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी, पदविका किंवा पीएच.डी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य मिळते.

पात्रता निकष पुढीलप्रमाणे- संपूर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी  पदवी परीक्षेत आणि पीएच.डी अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर परीक्षेत किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक. परदेशातील शिक्षणसंस्था QS World University Ranking नुसार पहिल्या 500 विद्यापीठांमध्ये असावी. अर्जदाराचे वय 35 वर्षांपेक्षा अधिक नसावे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी www.nosmsje.gov.in या केंद्र शासनाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी,

असे आवाहन समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes