जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात मोफत विधी सेवा सहाय्यासाठी विधिज्ञांची नियुक्ती
schedule02 Sep 25 person by visibility 239 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर येथे मोफत विधी सेवा सहाय्य देण्याकरीता विधिज्ञांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त आजी-माजी सैनिक, युध्द विधवा,वीर माता-पिता, माजी सैनिक विधवा व अवलंबितांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (डॉ.) भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे.
मोफत विधी सेवा सहाय्य देण्याकरीता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे विधी सेवा चिकित्सा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
या कक्षामध्ये सोमवार, मंगळवार व बुधवार या दिवशी ॲड. नितीन एन. कुलकर्णी संपर्क क्र. 8805150516 तर गुरुवार ते शुक्रवार या दिवशी ॲड. योगेश जोशी संपर्क क्र. 8076924579 यांची शासकीय सुट्या वगळून मोफत विधी सेवा सहाय्य देण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.